भाजपविरोधात ३०० जागा लढविल्या तर काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का? ममतांनी काँग्रेसला डिवचलं

वृत्तसंस्था, कोलकाता: ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का, याविषयी मला शंकाच आहे. मी त्यांना दोन जागा देत आहे, त्या त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्यांना अधिक जागा हव्या आहेत. मी म्हटले ठीक आहे, सर्व ४२ जागा लढवा,’ अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्ला चढविला.

‘ज्या ठिकाणी भाजप प्रमुख विरोधी आहे, तिथे काँग्रेसने देशभरात ३०० जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव मी दिला होता. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. आता ते मुस्लिम मतांसाठी राज्यात आले आहेत. जर त्यांनी ३०० जागा लढविल्या तर त्यांना ४० जागा तरी मिळतील का याबद्दल मला शंका आहे,’ असे ममता म्हणाल्या. ‘आम्ही आघाडीसाठी तयार होतो. त्यांना दोन जागा देऊ केल्या होत्या; पण त्यांनी त्या नाकारल्या. आता त्यांना सर्वच्या सर्व ४२ जागा स्वबळावर लढवू देत. त्यानंतर आमचा कुठलाही संवाद झालेला नाही, असेही ममता म्हणाल्या. ‘तुमच्यात (काँग्रेस) हिंमत असेल तर भाजपला उत्तर प्रदेश, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेशात हरवून दाखवा. मणिपूर जळत होते, तेव्हा तुम्ही कुठे होतात? आम्ही तिथे पथक पाठविले,’ असाही हल्ला ममतांनी केला.

भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यामध्ये राडा; महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवरही त्यांनी हल्ला केला. ‘स्थलांतरित पक्षी आहेत. फोटो काढण्याची ही संधी आहे, बाकी काही नाही. ‘इंडि आघाडीत असूनही त्यांनी आम्हाला यात्रेबद्दल कळविले नाही. मला प्रशासनाकडून कळले. त्यांनी डेरेक ओब्रायन यांना फोन केला आणि बंगालमधून यात्रेला परवानगी देण्याची विनंती केली. असे असे तर आलात कशाला बंगालमध्ये?’अशा शब्दांत ममतांनी संताप व्यक्त केला.

कोट

‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसबरोबर जागावाटपाची चर्चा अद्याप सुरूच आहे. लवकरच सर्व वादांचे निराकरण केले जाईल

राहुल गांधी, खासदार, काँग्रेस

नितिश कुमार यांनी भाजपसोबत संसार का सुरु केला?, राहुल गांधींनी कट टू कट सांगत बिहारमध्ये घेरलं

Source link

Congressindia blockolkata newsmamata banrjeeRahul Gandhitrinmool congressकाँग्रेस न्यूजममता बॅनर्जीराहुल गांधी
Comments (0)
Add Comment