पुढील महिन्यात येतोय Poco चा स्वस्त आणि मस्त फोन; अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले आणि ५०००एमएएचच्या बॅटरीसह येईल बाजारात

चीनी स्‍मार्टफोन कंपनी Xiaomi चा स्वतंत्र ब्रँड POCO भारतात लवकरच आणखी एक नवीन स्‍मार्टफोन लाँच करू शकते. या स्‍मार्टफोनचे नाव Poco X6 Neo असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोशल म‍ीडिया प्लॅटफॉर्म एक्‍स’ वर एका टिप्‍सटरनं याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं गेल्या महिन्यात भारतात X6 सीरीज सादर केली आहे. ह्यात Poco X6 आणि X6 Pro चा समावेश आहे. Poco X6 मध्ये Snapdragon 7s Gen 2 आणि X6 Pro मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra चिपसेट देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये AMOLED स्क्रीन १.५के रिजोल्यूशन आहे.

मार्चमध्ये येईल Poco X6 Neo

Poco X6 Neo बद्दल टिपस्टर @saanjjjuuu नं म्हटलं आहे की पोको पुढील महिन्यात आपला नवीन फोन लाँच करण्याची प्‍लानिंग करत आहे. म्हणजे मार्चमध्ये कधीही हा डिव्हाइस लाँच करू शकते. टिप्‍सटरनं अपकमिंग स्‍मार्टफोनच्या प्रमुख स्‍पेक्‍स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

टिप्‍सटरनुसार, अपकमिंग पोको फोनमध्ये ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी ६०८० प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पोकोचा हा फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येईल जी ३३ वॉट फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनला आयपी५४ रेटिंग मिळाली आहे म्हणजे हा पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो.

टिप्‍सटरनं असा देखील दावा केला आहे की Poco X6 Neo ची किंमत भारतात जवळपास १५ हजार रुपयांच्या असपास असू शकते. Poco X6 आणि X6 Pro ची किंमत पाहता, Poco X6 स्मार्टफोन ८ जीबी व २५६ जीबी आणि १२जीबी व २५६ जीबी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. याची किंमत अनुक्रमे १८,९९९ रुपये आणि २१,९९९ रुपये आहे. तसेच, X6 Pro स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २४,९९९ रुपये आणि १२ जीबी व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २६,९९९ रुपये मोजावे लागतील.

Source link

poco x6poco x6 neopoco x6 neo india launchpoco x6 seriesपोको एक्स६ सीरिजपोको फोन
Comments (0)
Add Comment