१०१ रुपयांमध्ये १००जीबी डेटा देत आहे Jio; जाणून घ्या कोणासाठी आला आहे हा प्लॅन

जिओनं जिओ एअरफायबर युजर्ससाठी शानदार प्लॅन सादर केले आहेत. यात काही डेटा अ‍ॅड ऑन प्लॅनचा देखील समावेश आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अतिरिक्त डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लॅन त्या युजर्ससाठी आहेत, जे जास्त डेटा वापरतात. जिओ एअरफायबरनं १०१ रुपये, २५१ रुपये आणि ४०१ रुपयांमध्ये डेटा बूस्टर प्लॅन ऑफर सादर केले आहेत. चला जाणून घेऊया यांची माहिती.

१०१ रुपयांचा प्लॅन

जिओच्या १०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० जीबी डेटा दिला जात आहे, परंतु यात कोणतेही व्हॉइस कॉलिंग बेनिफिट मिळत नाहीत. याची वैधता तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन इतकी असेल. तसेच स्पीड देखील बेस प्लॅन इतकाच असेल. प्लॅनची किंमत जीएसटी वगळून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पेमेंट

२५१ रुपयांचा प्लॅन

जिओ एअरफायबरचा २५१ रुपयांचा प्लॅन ५०० जीबी डेटा सह येतो. वर सांगितल्याप्रमाणे हा पण एक डेटा अ‍ॅड ऑन प्लॅन आहे. त्यामुळे या प्लॅनची वैधता देखील तुमच्या सक्रिय प्लॅन इतकी असते. या प्लॅनमध्ये देखील जीएसटी वेगळा द्यावा लागतो.

कुठून करता येईल रिचार्ज

हा प्लॅन सर्व जिओ एअरफायबर कस्टमरसाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन MyJio आणि Jio.com वरून रिचार्ज करता येईल.

नोट – जिओ एअरफायबरनं ४०१ रुपयांमध्ये देखील आणखी एक डेटा अ‍ॅड ऑन प्लॅन सादर केला आहे. जिओ एअरफायबरचा हा बेस प्लॅन १ टीबी डेटासह येतो. यात हाय स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड डेटासह ६४ केबीपीएस स्पीड ऑफर केला जात आहे. जिओ एअरफायबर प्लॅन ५९९ रुपये, ८९९ रुपये आणि १,१९९ रुपयांमध्ये येतात. यात नवीन ग्राहकांना ६ किंवा १२ महिन्याचे सब्सक्रिप्शन मिळते.

१४८ रुपयांमध्ये १२ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सब्सस्क्रिप्शन

Jio च्या १४८ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १०जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. हा Prime Video आणि Disney+Hotstar च्या सब्सक्रिप्शनसह सादर करण्यात आला आहे. प्लॅनमध्ये १२ OTT Apps चं सब्सस्क्रिप्शन देखील मिळतं. त्यामुळेच हा सर्वात लोकप्रिय प्लॅन्स पैकी एक आहे. हा डेटा बूस्टर प्लॅन आहे त्यामुळे तुमच्याकडे एक बेस प्लॅन असणं आवश्यक आहे.

Source link

jio airfiberjio airfiber data boosterjio airfiber data booster plansजिओजिओ एअरफायबरजिओ डेटा बूस्टर
Comments (0)
Add Comment