मुंबई– यंदा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २२.५ कोटी रुपयांची कमाई करून बॉलिवूडचे यावर्षीचे बॉक्स ऑफिसवरील खाते सुरु केले, परंतु आठवड्याच्या शेवटी हा सिनेमा झपाट्याने घसरु लागला. या चित्रपटाची कमाई इतक्या झपाट्याने कमी होईल असे कोणालाच वाटले नव्हते. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित झालेल्या सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे ॲक्शन रसिकांच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, त्या आता धुळीस मिळताना दिसत आहेत.
आधी बहिणीसोबत व्यंकटेश्वर मंदिरात पूजा मग अभिनेत्री दीपिका पदुकोण पोहोचली तिरुपतीला
sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने एका आठवड्यात म्हणजेच ८ दिवसांत १४६.५ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच नवव्या दिवशी चित्रपटाने केवळ ५.७५ कोटींची कमाई केली होती. एकूणच चित्रपटाने आतापर्यंत १५२.२५ कोटींची कमाई केली.
कॅन्सरमुळे माझी आई डॉक्टरांकडे आयुष्याची भीक मागत होती आणि तू… अभिनेत्रीचा पूनम पांडेवरील राग अनावर
वर्ल्डवाइड ‘फाइटर’ने २५८.७५ कोटींची कमाई केली
या सिनेमाचे जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ९ दिवसांत २५८.७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात आतापर्यंत केवळ ७६ कोटी रुपयेच कमावले आहेत, तर भारतात १८२.७५ कोटी रुपये कमावले आहेत.
‘इकडं तिकडं करण्यापेक्षा स्वयंपाक कर’, रवींद्र महाजनींच्या पत्नी आणि सासूबाईंमध्ये उडायचे खटके,पण…
फायटर देशभरात ४३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.
सुमारे २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशभरातील ४३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन व्यतिरिक्त या मेगा बजेट चित्रपटात दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील एरियल ॲक्शन सीन्सचे खूप कौतुक झाले आहे.
Source link