नोकिया सारख्या मजबुतीसह बाजारात येत आहे नवा स्मार्टफोन ब्रँड; तीन फोनची लाँच पूर्वीच दिसली झलक

HMD Global आतापर्यंत Nokia ब्रँडेड स्मार्टफोन लाँच करत होती. परंतु आता कंपनी HMD ब्रँडेड मोबाइल डिव्हाइस लाँच करणार आहे, जे कंपनीनं अधिकृतपणे टीज करण्यास सुरुवात देखील केली आहे. HMD Global च्या अधिकृत वेबसाइटवर नवीन मोबाइल डिव्हाइसेसचे कथित टीजर समोर आले आहेत जे Nokia Lumia सीरीज सारखे वाटत आहेत. कंपनी आपले नवीन स्मार्टफोन अफॉर्डेबल रेंजमध्ये सादर करणार आहे, अशी चर्चा आहे.

HMD Global स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये सादर केले जाऊ शकतात. कंपनीनं ऑफिशियल वेबसाइटवर आपले नवीन मोबाइल डिव्हाइस टीज केले आहेत. यांची डिजाइन पाहून वाटत आहे की कंपनी नोकिया लूमिया सीरीज सारखी डिजाइन असलेले स्मार्टफोन लाँच करू शकते. परंतु दाखवलेले डिव्हाइसचा लाँच केले जातील अशी कोणतीही घोषणा कंपनीनं केलेली नाही. टिपस्टर रोलंड क्वांट @rquandt नं आपल्या सोशल मीडिया हँडल X च्या प्रोफाईलवर एक पोस्ट शेयर केली आहे. यात कंपनीनं टीज केलेले हँडसेट दाखवण्यात आले आहेत. त्यानुसार हे फोन ब्लू, ग्रीन आणि पिंक कलर व्हेरिएंट्समध्ये बाजारात येतील.

बारकाईनं पाहिल्यास फोनच्या मागे दोन वर्तुळाकार रिंग्स दिसत आहेत जे कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसह फिट करण्यात आले आहेत. आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये हलकासा बम्प दिसत आहे. फोनचे किनारे वाटोळ्या आकाराचे आहेत. तसेच, फोन बॉक्स टाइप चेसिससह दिसत आहे ज्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. फोटोमध्ये एक डिव्हाइस ट्रिपल कॅमेऱ्यासह देखील दाखवण्यात आला आहे. ज्यात वर्टीकली तीन कॅमेरा दाखणव्यात आले आहेत. चार्जिंगसाठी डिव्हाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देखील मिळू मिळू शकतो. त्याचबरोबर ३.५मिमी हेडफोन जॅक देखील दिला जाऊ शकतो.

याआधी पण एचएमडी मोबाइल बद्दल लीक समोर आले आहेत. ज्यात हँडसेटचा कोडनेम N159V सांगण्यात आला होता. यात ड्युअल रियर कॅमेरा यूनिटचा समावेश देखील आहे, ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्टसह १०८-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेन्सर देण्यात आला आहे. तसेच प्लास्टिक फ्रेमसह काळ्या आणि सियान कलर ऑप्शनमध्ये हा फोन येण्याची शक्यता आहे. फोनच्या मागे लोगो देखील HMD चा असेल. कंपनी लवकरच या नवीन डिव्हाइसची घोषणा करू शकते.

Source link

hmd globalhmd global smartphonenokiaएचएमडी ग्लोबलनोकिया फोनस्वस्त स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment