आज राज्यात झालेल्या ४६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०५ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस’; सोमय्यांचा प्रहार
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४०० इतकी आहे. काल ही संख्या ४९ हजार ७९६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ०१८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार ९७९ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६३७ इतकी वाढली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार ०२७ अशी खाली आली आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ६३९ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ८३४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
मुंबईत उपचार घेत आहेत ५,२४४ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार २४४ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार १६० इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७७१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०४७ इतकी आहे.
धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५८४, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९९ वर आली आहे. तर धुळे जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगरही हादरले; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
२,९८,२०७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५९ लाख ७९ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७७ (११.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २०७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ८९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.