सॅमसंगनं भारतात पहिल्यांदा rugged स्मार्टफोन Samsung Galaxy XCover7 लाँच केला आहे. हा शानदार मिलिट्री ग्रेड रेटिंग आणि आयपी६८ रेटिंगसह आला आहे. म्हणजे फोन पाण, धुळीपासून वाचतोच परंतु उंचावरून पडल्यावर देखील सुरक्षित राहतो. त्याचबरोबर परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी ६१०० प्लस प्रोसेसर, ६जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा असे अनेक फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया याची किंमत.
Samsung Galaxy XCover7 ची किंमत आणि उपलब्धता
सॅमसंगनं भारतात Samsung Galaxy XCover7 स्मार्टफोन स्टँडर्ड आणि एंटरप्राइज एडिशनमध्ये लाँच केला आहे. स्टँडर्ड मॉडेलची किंमत २७,२०८ रुपये आणि एंटरप्राइज एडिशनची किंमत २७,५३० रुपये आहे. स्मार्टफोनच्या स्टँडर्ड मॉडेलवर १ वर्ष आणि एंटरप्राइज डिव्हाइसवर २ वर्षांची वॉरंटी मिळेल. सेल पाहता गॅलेक्सी एक्सकव्हर ७ स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर आणि सॅमसंग कॉर्पोरेट स्टोरच्या माध्यमातून उपलब्ध होईल. ब्रँड नवीन फोन गॅलेक्सी एक्सकव्हर ७ एंटरप्राइज एडिशनवर नॉक्स सुइटची १२ महिन्यांची मेंबरशिप मिळेल.
हे देखील वाचा:
Samsung Galaxy XCover7 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy XCover7 मध्ये ६.६ इंचाचा TFT एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यात फुल एचडी+ रिजॉल्यूशन, ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २०:९ अॅस्पेक्ट रेशियो, आणि Corning Gorilla Glass Victus+ ची सुरक्षा देण्यात आली आहे.
या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसरसह माली जी५७ जीपीयूचा वापर करण्यात आला आहे, जो परफॉर्मन्स वाढवतो.हा डिव्हाइस ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो, जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून १टीबी पर्यंत वाढवता येते. Samsung Galaxy XCover7 अँड्रॉइड १४ आधारित OneUI वर चालतो.
यात LED फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Galaxy XCover7 मध्ये ४,०५०एमएएचची बॅटरी, १५ वॉट फास्ट चार्जिंग, यूएसबी टाइप-सी पोर्ट, आणि POGO पिन चार्जिंग सपोर्ट आहे.
या Samsung मोबाइलमध्ये आयपी६८ पाणी आणि धूळ प्रतिरोधी रेटिंग, MIL-STD-810H रेटिंग, Dolby Atmos, आणि ३.५ मिमी ऑडियो जॅक सारखे फीचर्स आहेत. Samsung Galaxy XCover7 मध्ये 5G, वायफाय, ब्लूटूथ ५.३, NFC, GPS, ग्लोनास, गॅलीलियो, BeiDou, आणि USB 2.0 पोर्ट चा समावेश आहे.