nilesh rane: कोकणात राजकीय घडामोडींना वेग; नीलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवणार?

हायलाइट्स:

  • माजी खासदार नीलेश राणे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा.
  • नीलेश राणे कुडाळ या राणेंच्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा.
  • कुडाळ मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.

सिंधुदुर्ग:नारायण राणे (naeayan rane) केंद्रात मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सिंधुदुर्गात राजकीय घडामोडींना वेग आला असून नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात आगामी विधानसभेची निवडणूक कोण लढवणार या चर्चेला वेग आला आहे. या जागेसाठी माजी खासदार नीलेश राणे (nilesh rane) यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. असे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. (Former MP Nilesh Rane is likely to contest for Kudal Assembly seat)

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नीलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन आमदार होऊन दे, असे साकडे सिंधुदुर्गच्या राजासमोर घातल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. हे साकडे घातले जात असताना माजी खासदार नीलेश राणेही उपस्थित होते. याचा अर्थ आता नीलेश राणे हे लोकसभेची निवडणूक लढवणार नसून ते राज्याच्या विधानसभेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत हे स्पष्ट होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली; पाहा, ताजी स्थिती!

कुडाळ विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. वैभव नाईक हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा १० हजार ३७६ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत नाईक यांना एकूण ७० हजार ५८२ तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नाईक यांनी रणजित दत्तात्रय देसाई यांचा १ हजार ३४९ मतांनी पराभव केला होता.

क्लिक करा आणि वाचा- जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका जाहीर, ५ ऑक्टोबरला मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे एकूण तीन विधानसभेचे मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे असून त्यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कुडाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. तसेच सावंतवाडी हा मतदारसंघही शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथे सेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Source link

kudal constituencyNarayan RaneNilesh Ranevidhansabha electionकुडाळ विधानसभा मतदारसंघनारायण राणेनीलेश राणेविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment