पंतप्रधान योजनांबाबत गुरुवारी राष्ट्रीय बैठक; भागवत कराड नेमकं काय म्हणाले?

हायलाइट्स:

  • पंतप्रधान योजनांबाबत गुरुवारी राष्ट्रीय बैठक
  • केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती
  • १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात होणार बैठक

औरंगाबाद : पंतप्रधान योजनांबाबत गुरुवारी राष्ट्रीय बैठक होणार असून ‘नाबार्ड’सह सरकारी बँकांचे संचालक, डीएमआयसीचे संचालक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी औरंगाबादमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान जनधन योजना, मुद्रा योजना, डिजिटल ट्रान्स्फर, शेतकऱ्यांसाठीच्या योजना व डीएमआयसीमध्ये नवनवीन उद्योग येण्यासाठीच्या योजना व सवलती, याविषयी व्यापक आढावा, विचारविनिमय व राष्ट्रीय स्तरावरील ठोस निर्णय घेण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात राष्ट्रीय बैठक होणार आहेत.

nilesh rane: कोकणात राजकीय घडामोडींना वेग; नीलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवणार?

या बैठकीला विविध सरकारी बँकांचे राष्ट्रीय कार्यकारी संचालक, अर्थ विभागाचे सचिव, ‘डीएमआयसी’चे राष्ट्रीय संचालक, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष आदींची उपस्थिती राहणार असून, या प्रकारची बैठक शहरात पहिल्यांदाच शहरात होत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (१३ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले.

यानिमित्ताने पंतप्रधान योजनांचा जनसामान्यांना अधिकाधिक लाभ कशा पद्धतीने होऊ शकतो व त्यामध्ये आणखी कोणकोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत, याविषयी सखोल चर्चा होऊन राष्ट्रीय पातळीवरील निर्णय होणे अपेक्षित आहे. तसंच शेतकऱ्यांसाठीच्या कर्ज योजना, अडचणी, अडथळे यांचाही मागोवा घेण्यात येऊन प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या बैठकीचा उपयोग होईल. ‘डीएमआयसी’त नवनवीन उद्योगांना कर्ज व सवलती देण्यासाठीही विचारविनिमय होणार असल्याचं डॉ. कराड यांनी सांगितलं. ही बैठक हॉटेल ताज येथे होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Source link

AurangabadBhagwat Karadऔरंगाबाद न्यूजपंतप्रधान योजनाभागवत कराड
Comments (0)
Add Comment