Apple iPhone SE 4 ची लीक माहिती
नवीन लीक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर @MajinBuOfficial या युजरनं शेयर केला आहे. टिपस्टरने नवीन iPhone SE 4 ची डिजाइन रेंडर देखील पोस्ट केला आहे. यात फोन वेगळ्या लुक मध्ये दिसत आहे. तुम्ही पुढील पोस्टमध्ये पाहू शकता iPhone SE 4 बाजारातील मॉडेल सारखी डिजाइन दिसत आहे, परंतु याची साइज थोडी छोटी आहे.
टिपस्टरनं असं देखील लिहलं आहे की नवीन iPhone SE चे डायमेंशन जुन्या iPhone X सारखे असतील. फोनमध्ये डायनॅमिक आयलंड देखील दिसत आहे, जे याचे वेगळेपण आहे. डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर सिंगल कॅमेरा आणि LED फ्लॅश देखील दिसला आहे.
iPhone SE 4 संभाव्य लाँच टाइमलाइन
अॅप्पलची कमी बजेट असलेल्या SE सीरीज बद्दल ब्रँडनं अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु आतापर्यंत आलेल्या लीकनुसार डिवाइस यावर्षी 2024 च्या अखेरीस किंवा पुढील वर्षी २०२५ मध्ये लाँच होऊ शकतो. आता ब्रँड कडून कोणते अपडेट येतात ते पाहावं लागेल.
iPhone SE 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
iPhone SE 4 मध्ये नवीन iPhones प्रमाणे फ्लॅट एज डिस्प्ले डिजाइन दिली जाऊ शकते. अॅप्पलने टच आयडी डिवीजन बंद केली आहे आणि त्यामुळे नवीन एसई फेस आयडीला सपोर्ट करू शकतो. फोनमध्ये ६.१ इंचाचा आणि OLED डिस्प्ले मिळू शकतो. यात डायनॅमिक आयलंडचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
फोनच्या सिंगल रियर कॅमेऱ्यात ४८एमपीचा सेन्सर लावला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये परफॉर्मन्ससाठी पावरफुल ए१७ चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. बॅटरीच्या बाबतीत हा फोन ३२७९एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. फोन चार्ज करण्यासाठी यात एक यूएसबी-सी पोर्ट मिळू शकतो. तसेच एक अॅक्शन बटन देखील दिला जाऊ शकतो.