Google Play store वरील डेटा बॅकग्राउंडमध्ये सेव्ह होत राहतो, त्यामुळे अनेकदा प्ले स्टोर स्लो होतो. म्हणूनच अनेकदा जास्त डेटा स्टोर झाल्यामुळे तुमचा फोन देखील हँग होऊ लागतो. जर तुम्हाला देखील ही समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या गुगल प्ले स्टोरवरून डेटा रिमूव्ह करू शकता. इथे जाणून घ्या सोपी प्रोसेस.
तुमच्या अँड्रॉइड फोन मधील Google Play Store वरून असा डिलीट करा डेटा:
- सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सेटिंग्स ओपन करा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये स्क्रोल डाउन करून ‘Apps’ ऑप्शनवर टॅप करा.
- अॅप्समध्ये ‘All Apps’ वर क्लिक करा.
- त्यानंतर ऑल अॅप्समध्ये तुम्हाला Google Play Store चा ऑप्शन दिसेल.
- Google Play Store मध्ये जाऊन तुम्हाला ‘Storage & Cache’ मध्ये जावं लागेल.
- या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही गुगल प्ले स्टोर मधील तुमचा डेटा डिलीट करू शकता.
टीप:
तुम्ही होमपेज किंवा अॅप ड्रॉवर मध्ये अॅप आयकॉनवर टच अँड होल्ड करून आणि त्यानंतर इन्फो आयकॉनवर करून देखील डेटा दिलीत करण्याचा ऑप्शन मिळवू शकता.
अॅपमध्ये पुन्हा लॉग-इन करावं लागू शकतं
गुगल प्ले स्टोरवरून डेटा डिलीट केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा गुलग प्ले स्टोरमध्ये लॉगिन करावं लागू शकतं. गुगल प्ले स्टोरवरून डेटा रिमूव्ह केल्यानंतर जर तुमच्या फोनमधील मुख्य जीमेल अकाऊंट आणि प्ले स्टोर अकाऊंट वेगळं असेल तर तुम्हाला अकाऊंट चेंज करावं लागेल. जेणेकरून तुमचा अॅप डेटा योग्य ठिकाणी बॅकअप होऊ शकेल.