WhatsApp ओपन न करताच ब्लॉक करा अनावश्यक नंबर, जाणून घ्या प्रॉसेस

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज अनेकदा त्रासायदायक ठरतात. यातील बरेचशे मेसेज काही कामाचे नसतात, परंतु यांच्या वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्स मात्र डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला या बिनकामाच्या मेसेजेस पासून सुटकारा हवा असेल तर असे मेसेज पाठवणारे कॉन्टॅक्ट ब्लॉक केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताच फालतूचे मेसेज करण्याऱ्या युजर्सना ब्लॉक करू शकता.

अँड्रॉइड युजर्ससाठी

  • तुमच्या लॉक स्क्रीनवर दिसणारा अनावश्यक कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन लेफ्ट स्वाइप करा.
  • त्यानंतर थ्री डॉटवर टॅप करा.
  • नंतर तुम्हाला Block ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
  • त्यानंतर Report Contact ऑप्शनची निवड करा.
  • Report Contact त्या युजर्ससाठी असेल ज्या सेंडरला तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे.

iPhone युजर्ससाठी

  • लॉक स्क्रीनवर दिसणाऱ्या नको असलेल्या कॉन्टॅक्टच्या मेसेज नोटिफिकेशनवर टॅप करून होल्ड करा.
  • त्यानंतर नोटिफिकेशन्स स्वाइप डाउन करा आणि View ऑप्शनवर टॅप करा.
  • त्यानंतर कॉन्टॅक्ट नावावर टॅप करा, जे चॅट स्क्रीनच्या टॉपवर दिसत आहे.
  • त्यानंतर स्क्रोल डाउन करा आणि फिर Block This contact वर टॅप करा.
  • त्यानंतर Block Contact ऑप्शनवर कंफर्म करा.

नोट – हे फीचर नवीन WhatsApp व्हर्जनवर उपलब्ध होईल. परंतु त्यासाठी तुमच्या फोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन इंस्टॉल केलेलं असावं. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रमोशनल मेसेज आणि तत्सम नोटिफिकेशन्सची संख्या वाढली आहे, त्यामुळे अनावश्यक मेसेजेस येण्याचे प्रमाण वाढले आहे.

WhatsApp वरून आता कोणत्याही मेसेजिंग अ‍ॅपवर पाठवता येणार मेसेज

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आता आपल्या अ‍ॅपमध्ये एक असा बदल करणार आहे, ज्यामुळे युजर्सना अगदी नवा अनुभव मिळेल. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्सना थर्ड-पार्टी अ‍ॅप्ससह क्रॉस-मेसेजिंग सुविधा देऊ शकतं. अशाप्रकारे युजर्सना अनेक अ‍ॅप्स डाउनलोड करावे लागणार नाहीत आणि सिंगल अ‍ॅप द्वारेच प्रत्येक ठिकाणी चॅटिंग करता येईल.

सिद्धेश जाधव यांच्याविषयी

सिद्धेश जाधव
सिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.… Read More

Source link

how to block contacts on whatsapphow to block unwanted contacts on whatsappWhatsAppव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट ब्लॉक
Comments (0)
Add Comment