असा करा ऑनलाइन डेटिंग स्कॅमपासून बचाव
लोक दोन प्रकारे व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. यातील एक म्हणजे ऑनलाइन डेटिंग, लोक ऑनलाइन आपल्यासाठी पार्टनर शोधतात. या संधीचा फायदा घेऊन स्कॅमर्स तुम्हाला एका बनावट डेटिंग साइटवर घेऊन जातात, जिथे तुमच्यासाठी प्रेमळ गप्पा मारल्या जाता आणि त्यानंतर तुमची खाजगी आणि संवेदनशील माहिती चोरली जाते. किंवा तुमच्यावर पैसे गुंतवण्याचा दबाव टाकला जातो. जर तुम्ही त्यांची मागणी मान्य केली तर तुमचे ते पैसे घेऊन ते फरार होतात. त्यामुळे तुम्ही अश्या फसव्या डेटिंग साइटपासून चार हात लांब राहिलं पाहिजे. तसेच कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती शेयर केली नाही पाहिजे.
गिफ्ट विकत घेताना सावधान
व्हॅलेंटाइन डे वर ऑनलाइन गिफ्ट पाठवण्याचा सल्ला दिला जातो. यात एक लिंकवर क्लिक करून तुमच्या पार्टनरसाठी गिफ्ट आयटम सेलेक्ट करण्यास सांगितलं जातं. तसेच अनेक डिस्काउंट ऑफर देण्याचं प्रॉमिस केलं जातं. विशेष म्हणजे ही लिंक पूर्णपणे बनावट असते, ज्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात अडकता.
नोट –
मोबाइल युजर्सना सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटरवर व्हॅलेंटाइन डे गिफ्टच्या थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करू नका.