‘प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू’

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाचे भाषेचा वापर वाद निर्माण झाला.

‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. यावरच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ‘दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट करत प्रवीण दरेकर यांना इशारा दिलेला आहे.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आलं नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’ असं ते म्हणाले.

दरेकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान, या सगळ्या वादाविषयी प्रविण दरेकर यांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

ऐन सणासुदीत बाप लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू; परिसरात शोककळा

Source link

Pravin Darekarpravin darekar controversial statementspravin darekar twitterPune newspune news live todayRupali Chakankarrupali chakankar family photorupali chakankar tweet on amruta fadnavis
Comments (0)
Add Comment