मुंबईत १८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू, टूथपेस्ट ऐवजी चुकून ‘या’ विषारी औषधाने घासले दात

हायलाइट्स:

  • मुंबईत १८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू
  • टूथपेस्ट ऐवजी चुकून ‘या’ विषारी औषधाने घासले दात
  • एखाद्याचा असाही मृत्यू होईल याचा आपण विचारही करू शकत नाही!

मुंबई : दात घासल्याशिवाय आपल्या कोणाच्याच दिवसाची सुरुवात होत नाही. पण याच दात घासण्यावरून मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली आहे. (18 year old girl dies in Mumbai after accidentally brushing teeth rat poison instead of toothpaste)

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावी राहणाऱ्या अफसाना खान हिच्यासाठी रविवारची सकाळ ही अखेरची ठरली. तिने सकाळी दात घासण्यास सुरुवात केली मात्र तिच्या आयुष्यातला तो अखेरचा दिवस होता. अनावधानानं तिने उंदीर मारण्याचे विषारी औषधे ते पेस्ट म्हणून ब्रशवर घेतलं होतं आणि यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे.

‘प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टूथपेस्ट ऐवजी विषारी पेस्टने ब्रश केल्यामुळे त्याच्या वासाने आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने लगेच तोंड धुतलं. पण तोपर्यंत तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलंय तिच्यावर उपचार सुरू होते. पण विष शरीरात पसरल्याने रविवारी संध्याकाळी तिचा दुर्दैवी अंत झाला.

अफसाना ही शिक्षण घेत होती. पण तिचे शिक्षणाचे स्वप्न अर्धवटच राहिले. तिच्यामागे तिची आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असं कुटुंब होतं. तिची आई फळं विकून घर चालवायची. पण तिच्या अशा जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून घरातील विषारी वस्तू सहज हाताला येतील अशा ठिकाणी ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. (18 year old girl dies in Mumbai after accidentally brushing teeth rat poison instead of toothpaste)

Weather Alert : मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

Source link

mumbai breaking news today livemumbai crime newsmumbai girl diesmumbai marathi news livemumbai news today livemumbai toothpaste caserat poison
Comments (0)
Add Comment