रील बनवणाऱ्या इनफ्लुएंसर्सना केंद्र सरकार देणार पुरस्कार, ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ साठी असा करा अर्ज

भारत सरकारनं नव्या पिढीच्या क्रिएटर्स आणि इनफ्लुएंसर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ घोषणा केली आहे. सरकारनं म्हटलं आहे की अश्या क्रिएटर्सना ओळख मिळवून देणं आणि देशातील की डिजिटल क्रिएटर इकोनॉमीचा सन्मान करणं हा या अवॉर्ड्सचा उद्देश आहे. हे अवॉर्ड्स २० वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये दिले जातील आणि यासाठी नॉमिनेशंस सुरु झालं आहे.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT (MeitY) नं अवॉर्ड्सची घोषणा करताना सांगितलं आहे की भारताचा विकास आणि संस्कृतीला लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या क्रिएटर्सचा सन्मान करणं हे ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ चं ध्येय आहे. जे क्रिएटर्स डिजिटल विश्वात सकारात्मक सामाजिक बदल तसेच इनोवेशन आणि क्रिएटिव्हिटीला चालना देत आहेत, हा अवॉर्ड त्यांच्यासाठी आहे.

MyGov India कडून मिळेल अवॉर्ड

अधिकृत स्टेटमेंटमध्ये मिनिस्ट्रीनं म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत क्रिएटर इकोनॉमीच्या प्रभाव आणि सामाजिक बदलतील सहभागाचा उल्लेख करतात. त्या दिशेने काम करत आता MyGov India नं नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची घोषणा केली आहे. हा अवॉर्ड डिजिटल इनोव्हेटर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना ओळख देईल.

क्रिएटर्स अवॉर्डसाठी असा करा अर्ज

  • नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्ससाठी इनफ्लुएंसर्स किंवा क्रिएटर्स MyGov वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात, त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सर्वप्रथम https://innovateindia.mygov.in/national-creators-award-2024/ वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर निळ्या रंगाच्या ‘Nominate Now’ बटनवर क्लिक करा.
  • इथे नाव आणि नागरिकता सांगितल्यानंतर OTPच्या मदतीनं लॉगिन करावं लागेल.
  • इथे तुम्हाला योग्य कॅटेगरी निवडल्यानंतर तुमची माहिती द्यावी लागेल आणि सोशल मीडिया अकाऊंट्सची लिंक शेयर करावी लागेल.
  • अखेरीस तुम्हाला Apply वर क्लिक करावे लागेल.

या कॅटेगरीजमध्ये मिळतील क्रिएटर्स अवॉर्ड्स

सरकार ज्या कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड देणार आहे त्या लिस्टमध्ये बेस्ट स्टोरीटेलर अवॉर्ड, द डिसरप्टर ऑफ द इयर, सेलिब्रिटी क्रिएटर ऑफ द इयर, ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज आणि मोस्ट इंपॅक्टफुल अ‍ॅग्री क्रिएटर इत्यादींचा समावेश आहे. यांची लिस्ट तुम्ही MyGov वेबसाइटवर पाहू शकता. इथे अप्लाय करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी आहे.

Source link

creators awards 2024national creators awardsnational creators awards 2024नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड २०२४भारत सरकार
Comments (0)
Add Comment