Valentine’s Day Google Doodle
गुगलच्या नवीन व्हॅलेंटाइन डूडलवर क्लिक केल्यावर क्विज ओपन होईल. इथून तुम्ही तुमच्या केमिकल कंपाउंड बाबत जाणून घेऊ शकता. तसेच स्वतःच केमिकल कंपाउंड नवडून तुम्ही हे देखील जाणून घेऊ शकता की कोणत्या केमिकल सोबत तुमचा बॉन्ड चांगला होईल.
गुगलची खास क्विज
- आजच्या गुगल डूडलवर क्लिक करा.
- Chemistry Cupid क्विज ओपन करा.
- स्टार्ट क्विजवर क्लिक करा.
- तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.
- प्रश्नांची उत्तरं दिल्यावर तुम्ही कोणतं केमिकल आहात हे सांगितलं जाईल.
- हे केल्यावर स्टार्ट बॉन्डिंगवर टॅप करून तुम्ही जाणून घेऊ शकता की कोणत्या केमिकल सोबत तुमचं चांगलं बॉन्डिंग चांगलं होईल.
व्हॅलेंटाइन डेचा इतिहास
आज म्हणजे १४ फेब्रुवारीच्या दिवशी सम्राट क्लॉडियस द्वितीयनं संत व्हॅलेंटाइन यांना फाशी देण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन एक पादरी होते, ज्यांनी ख्रिश्चन जोडप्यानं लग्न करण्यास खूप मदत केली होती. तुरुंगवासात असताना देखील त्यांनी एका आंधळ्या मुलीची काळजी घेतली आणि तिची खूप मदत केली. त्यांची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
याआधी गुगलनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गुगल डूडल बनवलं होतं. यात परेडचा इतिहास दाखवण्यात आला होता. या डूडल मध्ये परेड वेगवेगळ्या स्क्रीन दाखवण्यात आली होती, ज्यात पहिली ब्लॅक अँड व्हाइट, दुसरी कलर टीव्ही आणि तिसरी मोबाइलची स्क्रीन होती.