नवीन प्लॅनमध्ये दमदार स्पीडसह २० पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. ४७४ रोज या हिशोबाने जर तुम्ही प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला ४००एमबीपीएस स्पीड मिळणार आहे. तर दर महिन्याला ४२४ रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला ३००एमबीपीएस स्पीड मिळतो. परंतु या स्पीडचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वर्षभराचा रिचार्ज करावा लागेल. म्हणजे संपूर्ण वर्षभराचं पेमेंट एकत्र करावं लागेल. विशेष म्हणजे Jio Broadband मध्ये या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५५० रुपये खर्च करावे लागतील. ४२४ रुपयांच्या प्लॅननुसार, तुम्हाला १४ रुपये प्रतिदिन खर्च करावा लागेल.
ही ऑफर १२ फेब्रुवारीपासून १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन ३० दिवसांचे सब्सक्रिप्शन ऑफर करतात आणि हे खरेदी केल्यास तुम्हाला OTTPlay, SonyLIV, ZEE5, SunNXT, Alt Balaji, Aha Telugu, Nammaflix, RunnTV, OmTV, Play Flix, Bollywood Play, iTap, Kancha Lanka, Fancode चं सब्सक्रिप्शन देखील मोफत दिलं जाईल. म्हणजे एवढ्या स्पीडनं मिळणारं इंटरनेट कशासाठी वापरायचं हे टेंशन घेण्याचं कारण नाही. कारण सब्सस्क्रिप्शनमध्ये हाय स्पीड इंटरनेटही मिळेल आणि OTT सब्सस्क्रिप्शनही मिळेल.
कंपनीनं आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे की, ‘होम एंटरटेनमेंटसाठी Excitel चा नवीन प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. घरात क्वॉलिटी टाइम स्पेंड करण्यासाठी हे प्लॅन डिजाइन करण्यात आले आहेत. म्हणजे तुम्ही घर बसल्या या ऑफर्सचा लाभ घेता येईल. त्यामुळे युजर्सना हे प्लॅन खूप आवडू शकतात. कारण कमी किंमतीत तुम्हाला चांगल्या इंटरनेटसह अन्य अनेक ऑफर्स देखील मिळत आहेत.’