थर्मोन्यूक्लियर मटेरियल बनवण्याची घोषणा IIT मंडीनं गेल्यावर्षी जून मधेच केली होती. आता हे संशोधन जर्मनीच्या सायन्स जर्नल Angewandte Chemie मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आयआयटी च्या स्कुल ऑफ फिजिकल सायन्स मध्ये प्रोजेक्टचे नेतृत्व करणाऱ्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अजय सोनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेयर केली आहे.
पोस्टमध्ये प्रोफेसरनी सांगितलं आहे की कशाप्रकारे हा थर्मोइलेक्ट्रिक जेनरेटर चालतो. पोस्टमध्ये त्यांनी लिहलं आहे की हा थर्मोइलेक्ट्रिक जेनरेटरचा फायनल व्हर्जन आहे, ज्यात हा ह्यूमन टच सेन्सरसह कसा चालतो हे दाखवण्यात आलं आहे. संशोधनानुसार, डिवाइस फक्त मानवी स्पर्शाने देखील चार्ज करता येईल आणि विशेष म्हणजे हा जवळपास सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चार्ज करू शकेल. संशोधकांच्या टीमनं थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल सिल्व्हर टेल्यूराइड नॅनोवायरपासून बनवला आहे.
त्यांनी दाखवलं आहे की कशाप्रकारे डिवाइस मानवाने स्पर्श केल्यावर एक आउटपुट वोल्टेज देण्यास सुरुवात करतो. डॉक्टर सोनी यांनी सांगितलं आहे की लो-पावर डिवाइस चार्ज करणे आता खूप सोपं होईल. हे डिवाइस आता माणसाच्या शरीराच्या गरमीने चार्ज केले जातील. यासाठी त्यांनी हा थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल बनवला आहे. तसेच, Science Direct नुसार, हा उष्णतेचे विजेट किंवा विजेचे उष्णतेत थेट रूपांतर करतो.
थर्मोइलेक्ट्रिक इफेक्टचा पहिला भाग आहे- उष्णतेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण करतो, ज्याचा शोध १८२१ मध्ये फिजिसिस्ट थॉमस सीबॅक यांनी लावला होता. त्यांनतर फ्रेंच फिजिसिस्ट जीन पेल्टियर यांनी यावर अधिक संशोधन केलं. त्यामुळे याला पेल्टियर सीबॅक इफेक्ट देखील म्हटलं जातं. दुसरा भागात जेव्हा विजेच्या प्रवाहामुळे हीट किंवा कूलिंग इफेक्ट निर्माण केला जातो. याचा शोध १८५१ मध्ये विलियम थॉमसन यांनी लावला होता.