कधी आहे माघ सप्तमी?
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीचा प्रारंभ 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजून 12 मिनिटांपासून होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. परंतु, उदया तिथीमध्ये सप्तमी तिथी 16 ला असल्यामुळे सप्तमी तिथीचे व्रत 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
माघ सप्तमी पूजा विधी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयापूर्वीच उठावे. त्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार करा. स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्याला जल देताना त्यात अक्षता, तीळ, रोली, दूर्वा, गंगाजल मिसळायला विसरू नका. तसेच “ॐ सूर्याय नमः” मंत्र जपत सूर्याला अर्घ्य द्या.
त्यानंतर पूर्ण विधी आणि शास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करा. तसेच सूर्य चालीसा आणि सूर्य कवच पठण करा. शेवटी सूर्यदेवाची आरती करून सुख-समृद्धीची कामना करा. आपल्या मनोकामना पूर्णतेसाठी व्रतही ठेवा. तुम्ही काही कारणामुळे व्रत ठेवू शकत नसाल, तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की करा.