हायलाइट्स:
- मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली अज्ञात आलिशान कार
- कार चालकाने जे सांगितलं ते वाचून हादराल
- तपासात धक्कादायक कारण उघड
मुंबई : कानात हेडफोन घालून रस्त्यावर बेधुंद चालणारे आपण अनेक हेडफोन घालून मुंबईत कार चालवणाऱ्या व्यक्तीला चांगलाच फटका बसला आहे. ही घटना थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये अचानक एक अज्ञात कार शिरल्याची नधक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अचानक एक कार शिरली आणि खळबळ उडाली. बरं ही काही साधीसुधी कार नव्हती तर थेट आलिशान मर्सडिज होती.
या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही एक मर्सडिज कार होती. या प्रकरणी संबंधित मर्सडीज कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. खरंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी आणि त्यानंतर इतर सर्व गाड्या असा त्यांचा ताफा असतो. मात्र, अचानक एक अज्ञात कार शिरल्याने खळबळ उडाली.
इतकंच नाहीतर वेगाने कार चालवत असल्याचे रस्त्यावरील नागरिकांच्या जिवाला धोका होताच. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत कार चालकाविरुद्ध भांदवि कलम २७९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम २७९ आणि १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, कार चालक हा जिममधून घरी चालला होता. त्याने कानामध्ये इयरफोन घातले होते. त्यामुळे तो कुणासोबत जात होता, याची त्याला कल्पनाच नव्हती. पण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.