व्हर्च्युअल एटीएम म्हणजे काय
चंदीगढ मधील फिनटेक कंपनीनं व्हर्च्युअल एटीएम सिस्टम सादर केली आहे. ही एक कार्डलेस आणि हार्डवेयर लेस कॅश काढण्याची सर्व्हिस आहे. यात एटीएम कार्ड आणि पिनची आवश्यकता नाही.
व्हर्च्युअल एटीएममधून पैसे कसे काढायचे
व्हर्च्युअल एटीएममधून काढण्यासाठी स्मार्टफोन आवश्यक आहे. तसेच मोबाइल बँकिंग आणि इंटरनेटची देखील उपलब्ध असावं. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन मोबाइल बँकिंग द्वारे कॅश काढण्याची रिक्वेस्ट टाकावी लागेल. यात मोबाइल बँकिंग अॅप तुमच्यकडे असलेल्या फोन नंबरसह रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे.
ओटीपी द्वारे होईल काम
त्यानंतर बँक जनरेटेड ओटीपी रिक्वेस्ट टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला PayMart शॉपवर ओटीपी दाखवावा लागेल. जो पाहून तुम्हाला दुकानदाराकडून कॅश मिळवता येईल. तुम्हाला मोबाइल बँकिंग अॅप व्हर्च्युअल पेटीएम Paymart च्या दुकानदारांची यादी देखील दाखवेल, ज्यात नाव, लोकेशन, फोन नंबर दाखवले जातील. यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डची आवश्यकत नाही.
कोणाला वापरता येईल व्हर्च्युअल एटीएम
व्हर्च्युअल एटीएमच्या माध्यमातून आयडीबीआय बँक, इंडियन बँक, जम्मू कश्मीर बँक आणि Karur बँक सोबत भागेदारी केली आहे. सध्या व्हर्च्युअल एटीएम चंदीगढ, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, मुंबईमध्ये उपलब्ध आहे. ही सेवा मार्चपर्यंत संपूर्ण देशात रोलआउट केली जाईल. त्याचबरोबर कंपनी इतर अनेक बँकांशी संपर्क साधत आहे.
किती पैसे काढता येतील?
व्हर्च्युअल एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना कमीत कमी १०० रुपये काढावे लागतील. तसेच एका वेळी जास्तीत जास्त २,००० रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. या वर्चुअल एटीएमला मासिक मर्यादा देखील देण्यात आली आहे. याची मंथली लिमिट १० हजार रुपये आहे.