मिरजेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे खड्ड्यांविरोधात आंदोलन, चक्क आमदाराच्या फोटोवर ओतलं चिखलाचं पाणी

हायलाइट्स:

  • मिरजेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे खड्ड्यांविरोधात आंदोलन
  • महापालिकेला सोडून आमदारांना धरले जबाबदार
  • घरासमोर आंदोलन करण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इशारा

सांगली : मिरज शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या कार्यकर्त्यांनी मिरजचे भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या प्रतिमेवर चिखल फेकला. आमदार खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून यापुढे त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल महापालिकेला जबाबदार न धरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या आमदारांविरोधात आंदोलन केले जात आहे.

धक्कादायक! दशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबाची बोट पलटी होऊन ११ जण बुडाले, ३ जणांचे मृतदेह हाती
मिरज शहर मिशन हॉस्पिटल चौक या ठिकाणी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि मिरज रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मन्सूर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला मिरजचे आमदार सुरेश खाडे हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी आमदार खाडे यांच्या प्रतिमेवर चिखली फेकला. येत्या आठ दिवसांमध्ये जर मिरज शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजीचे काम झाले नाही तर, आमदारांचे निवासस्थान किंवा कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

सांगली महानगरपालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याचे बहुतांश काम पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महानगरपालिकेला जाब विचारण्याऐवजी याबाबत भाजपच्या आमदारांविरोधात आंदोलन केले जात आहे. यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

बापरे! मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली अज्ञात आलिशान कार, तपासात धक्कादायक कारण उघड

Source link

MirajNCP Agitationncp workers agitationSangli newssangli news live todaysangli news todaysangli news today livesangli news today marathi
Comments (0)
Add Comment