टिप्सटरनं दिलेल्या माहितीनुसार, iPhone 16 सीरीजमध्ये २ एक्स्ट्रा फोन्स जोडले जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार SE मॉडेल्स यात जोडले जाऊ शकतात, जे SE आणि Plus SE नावाने येऊ शकतात. हे एसई मॉडेल आयफोन १६ पेक्षा स्वस्त असण्याची शक्यात आहे. त्यामुळेच यांची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे.
‘X’ वर एका टिप्सटरने आगामी आयफोन सीरिजची माहिती दिली आहे. यात सांगण्यात आलं आहे की iPhone 16 सीरीजमध्ये iPhone 16 SE, iPhone Plus SE, iPhone 16, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चा समावेश केला जाऊ शकतो. या संबंधित डिजाइनचे देखील अनेक फोटोज समोर आले आहेत. यात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. परंतु यातून एक गोष्ट स्पष्ट झालं आहे की आगामी iPhone मध्ये Apple जुन्याच डिजाइनचा वापर करणार आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE मध्ये 60Hz Refresh Rate असलेला डिस्प्ले मिळू शकतो. तर iPhone 16 Plus SE मध्ये देखील हाच रिफ्रेश रेट मिळेल फक्त कंपनीनं याची डिस्प्ले साइज ६.७ इंच ठेऊ शकते. iPhone 16 च्या डिस्प्लेमध्ये देखील बदल पाहायला मिळेल कारण यात ६.३ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. म्हणजे फोनच्या साइज मध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळेल. iPhone 16 Pro Max मध्ये यापेक्षा मोठा दिला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. सीरिजच्या या टॉप व्हेरिएंटमध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले मिळेल जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.
सध्या समोर आलेली माहिती फक्त लीक आहे, त्यामुळे यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. अलीकडेच iPhone SE 4 बद्दल देखील माहिती आली होती. जो कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन असण्याची शक्यता आहे. आता अॅप्पल आपल्या आयफोन १६ सीरिजमध्ये स्वस्त एसई मॉडेल आणते की वेगळा एसई मॉडेल लाँच करते हे पाहावं लागेल.