Apple चा मिक्स्ड रियालिटी हेडसेट Vision Pro काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. याची किंमत ३५०० डॉलर (जवळपास २,९०,००० रुपये) आहे, परंतु या हेडसेटमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. The Verge नुसार, अनेक युजर्स हा रिटर्न करत आहेत. रिटर्न करण्याची अनेक कारणे युजर्सनी सांगितली आहेत. यात हा आरामदायक नसणे हे देखील एक कारण सांगण्यात आलं आहे.
वापर करणाऱ्या अनेक कस्टमर्सनी हा घालणे अनकंफर्टेबल असल्याचं म्हटलं आहे. याची डिजाइन अशी आहे की डिवाइसचे जास्त वजन पुढील बाजूस देण्यात आलं आहे. त्यामुळे डोळ्यांवर जास्त वजन येत आहे. दुसरं कारण कारण असं आहे की हे डिवाइस घातल्यानंतर डोकं दुखत आहे. हेडसेट घातल्यावर काही वेळाने त्यांचं डोकं दुखत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर हेडसेट परत करण्याची कारणे सांगितली आहेत.
Vision Pro च्या अनेक युजर्सनी मोशन सिकनेसची तक्रार केली आहे. तसेच, काही युजर्सना वाटत आहे की रोजच्या आयुष्यात हा डिव्हाइस जास्त उपयुक्त नाही. म्हणजे दैनंदिन आयुष्यात यावर जास्त काम करता येत नाही. तसेच गेम्स खेळणे देखील यात जास्त मनोरंजक वाटत नाही. एकंदरीत एवढी जास्त किंमत असून देखील अॅप्पल व्हिजन प्रो व्हॅल्यू फॉर मनी फिचर देत नाही.
Apple Vision Pro मिक्स्ड रियालिटी हेडसेटची किंमत २५६ जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी ३,४९९ डॉलर (जवळपास २,९०,००० रुपये) मोजावे लागतात. तसेच ५१२ GB व्हेरिएंटची किंमत ३,६९९ डॉलर (जवळपास ३,०७,००० रुपये) आणि १ टीबीची किंमत ३,८९९ डॉलर (जवळपास ३,२३,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. याची विक्री अमेरिकेत अॅप्पल स्टोर्सच्या माध्यमातून केली जात आहे. यात एक एक्सटर्नल बॅटरी पॅक मिळतो जो एका केबलच्या माध्यमातून कनेक्ट होतो. Vision Pro मध्ये सहा मायक्रोफोन, दोन प्रायमरी कॅमेरे, सहा सेकंडरी (ट्रॅकिंग) कॅमेरे, आय ट्रॅकिंगसाठी चार कॅमेरे, एक LiDAR स्कॅनर आणि सहा इतर सेन्सर देण्यात आले आहेत.