police caught fake notes: बनावट नोटा छापणारे रॅकेट गजाआड; ‘अशा’ छापत होते नकली नोटा

हायलाइट्स:

  • नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळ्या सक्रिय.
  • याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
  • या कारवाईत ५०० आणि १०० च्या बनावट नोटांसह एकूण ९ लाख ७८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक जिल्ह्यातील गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या सुरगाणा तालुक्यात सध्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलिस या टोळ्यांच्या मागावर असून, याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण सात जणांना अटक झाली आहे. तर छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (police caught racketeers printing fake notes in nashik)

सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागात बनावट १०० ची नोट देऊन फक्त १० ते २० रुपयांची खरेदी करून या बनावट नोटा व्यवहारात आणत असल्याचे काही दिवसांपूर्वी उंबरठाण येथे उघडकीस आले होते. त्यावेळी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या येवल्यातील हरिष गुजर व बाबासाहेब सैद या दोघांना सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आणखी काही जणांची नावे समोर आल्याने अक्षय राजपूत यास येवल्यातून ताब्यात घेण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! टोळक्याने मारहाण केल्यानंतर तरुणाने केली आत्महत्या; घातपात झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

सध्या हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर यात सहभागी असलेला व २० वर्षांपासून प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय करणारा मुख्य संशयित किरण बाळकृष्ण गिरमे (वय ४५ रा. विंचूर) याच्यासह प्रकाश रमेश पिंपळे (वय ३१, रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (वय २७ रा. चांदवड), आनंदा दौलत कुंभार्डे (वय ३५, रा. चांदवड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट नोटांसाठी वापरलेले प्रिंटर, कॉम्प्युटर, स्कोडा कारसह इत्यादी साहित्यासह १०० रुपयांचे पाठपोट छपाई केलेले १७७ कागद व ५०० रुपयांची छपाई केलेले २६५ कागद जप्त करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- देवरेंच्या बदलीनंतर चित्रा वाघ संतापल्या, आमदार लंकेंसह सरकारवर केले आरोप

अशा छापत होते नोटा

हे संशयित संगणक आणि प्रिंटरच्या मदतीने बनावट नोटा तयार करत होते. एका कागदावर चार बनावट नोटा प्रिंट केल्या जात होत्या. त्यानंतर बाजारात अवघ्या दहा, वीस रुपयांसाठी या नोटा चलनात आणल्या जात होत्या. या कारवाईत पोलिसांनी शंभराच्या ८८ हजार २०० रुपयांच्या तर ५००च्या पाच लाख तीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा अस्सल नोटांसारख्या दिसत असल्याने बाजारात सहज खपविल्या जात होत्या.

क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापणार; उद्या भाजपचे आघाडी सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

संशयित कोठडीत

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांना सोमवारी (दि.१३) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता त्यातील प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, मुख्य संशयित किरण गिरमे व आंनंदा कुंभार्डे या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून या बनावट नोटांप्रकरणी यशस्वी तपास करून सात जणांना गजाआड केले आहे. त्यांच्यासमवेत पोलिस उपनिरिक्षक दिलीप पवार, एएसआय प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, रामभाऊ मुंढे, पराग गोतरणे, हवालदार हनुमंत महाले, वसंत खांडवी, संतोष गवळी आदींनी यांनी परिश्रम घेतले.

बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांपैकी सर्व प्रथम दोघांना अटक केली होती. आता यात सात जणांना अटक झाली आहे. मुख्य आरोपी विंचूर (ता. येवला) येथील असून आम्ही त्याचा तपास करीत आहोत.

संदीप कोळी, पोलिस निरीक्षक.

Source link

fake notesnashikpolice caught racketeersprinting fake notesबनावट नोटाबनावट नोटा छापणारे गजाआड
Comments (0)
Add Comment