दुचाकी वाहने चोरणाऱ्या चोरास सहकार नगर पोलिस स्टेशन कडून अटक

पुणे : परवेज शेख

उच्च शिक्षीत इंटिरीअर डिझायनींगचा डिप्लोमा करुन व्यसनाच्या आधीन गेल्याने दुचाकी वाहने चोरणा-या चोरास सहकारनगर पोलीसा कडुन अटक १,९५,००० किंमतीच्या ३ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड

दि. ११/०२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की एक इसम अंगामध्ये काळे रंगाचे जॅकेट व निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली असुन चोरीची काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. MH-12-FE-4596 हिच्यासह सावरकर चौक धनकवडी पुणे येथे थांबला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे परवानगीने सहकारमगर पोलीस स्टेशन पुणे शहर, तपास पथकाकडील स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इराम गाडी क्र. MH-12-FE-4596 हिचेवरून सावरकर चौकातुन पुढे जात असताना दिसल्याने लागलीच त्यास स्टाफचे मदतीने थोडयाच अंतरावर ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत प्रभाकर कान्हेकर वय ४७ वर्षे रा.स.नं.५७३, प्लॉट नं.१६, साहील सोसायटी फ्लॅट नं.१, महाविर फर्निचर दुकानाजवळ बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले, त्याचे ताब्यात एक अॅक्टीवा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी त्याने दुचाकी गाडी डीमार्ट पुणे सातारा रोड पुणे याठिकाणा वरून दि.०८/०२/२०२४ रोजी दुपारी ०१.३० वा. चे सुमारास चोरल्याचे कबुल केले सदर गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. ४५/२०२४ भा.द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले सदर आरोपी कडुन एकुण १,९५,०००/- रु किंमतीची ३ वाहने हस्तगत करण्यात आली.

Open Link 👇👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C3Yo2tpSpSm/?igsh=cXpkYnl2bWg5engw

सदरची कागगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सो। पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सोो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/reel/C3Yo2tpSpSm/?igsh=cXpkYnl2bWg5engw
Comments (0)
Add Comment