पिचाई एका वेळेस २० स्मार्टफोन का वापरतात?
Google आणि Alphabet या दिग्गज कंपन्यांचे CEO Sundar Pichai यांनी एका मुलाखतीच्या एका उत्तरात बोलताना सांगितलं की, ते एका वेळेस २० पेक्षा अधिक स्मार्टफोनचा वापर करतात. कारण त्यांना Google चे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या स्मार्टफोनवर कसे चालतात, हे पडताळून पहायचं असतं. यासाठी त्यांना २० आणि त्यापेक्षा अधिक स्मार्टफोन वापरावे लागतात.
स्वतःवर ताबा आवश्यक – पिचाई
Sundar Pichai यांनी मुलाखतीदरम्यान स्वतःच्या दैनंदिन वापरातील तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. पण, त्यांनी तंत्रज्ञानाच्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी देखील सांगितल्या. एका प्रश्नात त्यांना विचारण्यात आले की, ‘ तुमचे मुलं स्क्रीनवर किती वेळ घालवतात?’ या प्रश्नाच्या उत्तरात त्यानी सांगितलं की, ‘कडक नियमांपेक्षा स्वतःवर ताबा असं महत्त्वाचे आहे.’ यावरून तुम्हाला देखील अंदाज आला असेल की Sundar Pichai यांचा तंत्रज्ञानाविषयी किती प्रगल्भ दृष्टिकोन आहे.
पिचाई वारंवार पासवर्ड बदलतात का?
आपण सुरक्षेसाठी वारंवार पासवर्ड बदलतो. पण, याविरुद्ध Google आणि Alphabet सारख्या दिग्गज कंपनीच्या CEO ने वारंवार पासवर्ड बदलत नसल्याचं मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असणार. पण, पिचाई हे सुरक्षेसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करतात. Sundar Pichai यांचा Artificial Intelligence म्हणजेच AI वर देखील विश्वास आहे. विशेष म्हणजे पिचाई यांचं मत आहे की, AI हे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी तंत्रज्ञान आहे. पिचाई हे या तंत्रज्ञानाची तुलना आग आणि विजेच्या शोधासारखी करता.
दिग्गज करतात ‘ते’ आपण का नाही?
Google आणि Alphabet सारख्या दिग्गज कंपनीचे CEO Sundar Pichai हे रोज २० पेक्षा अधिक स्मार्टफोन वापरतात. अर्थातच त्यांच्याकडील स्मार्टफोन हे नव्या तंत्रज्ञनाचे असणार. पण, तरीही त्यांनी तंत्रज्ञान वापरताना स्वतःवर ताबा असावा, असं मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. यावरून त्यांची तंत्रज्ञान वापरताना असलेली जागरूकता दिसून येते.
हे देखील महत्त्वाचे….
तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात नव्या गोष्टी उदयाला येतात. अनेक कंपन्या नवनवे तंत्रज्ञान आणतात. पण, हे सगळं करताना त्याचा अतिवापर म्हणजेच ॲडिक्शन होणार नाही. याची देखील काळजी घ्यायला हवी. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या आणि वाईट बाजू आपल्याला समजल्यास योग्य वापरासह आपणही तंत्रज्ञान क्षेत्रात स्मार्ट होऊ.