जेव्हा तुम्ही कस्टमर सर्व्हिस नंबर शोधता, तेव्हा गुगलवर तो नंबर दिसू लागतो आता त्याच्या बाजूला “टॉल्क टू अ लाइव्ह रिप्रेजन्टेटिव्ह” चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर गुगल त्या सपोर्ट नंबरवर कॉल करेल आणि कॉल होल्ड करेल जो पर्यंत एखादा कस्टमर रिप्रेजन्टेटिव्ह बोलत नाही. त्यानंतर गुगल तुम्हाला कॉल करेल आणि तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.
कॉल रिक्वेस्ट टाकण्यासाठी तुम्हाला तुम्ही का कॉल करत आहात हे सांगावं लागेल. उदाहरणार्थ, एअरलाइनला कॉल करताना, बुकिंग मध्ये बदल, लगेज इश्यू, रद्द झालेलं विमान, फ्लाईट चेक इन, मिस्ड फ्लाइट आणि विमानाला झालेला उशीर अशी कारणे द्यावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यावा लागेल, ज्यावर गुगल एसएमएस अपडेट देईल. रिक्वेस्ट पेजवर तुम्हाला किती वेळ वाट पाहावी लागू शकते याचा अंदाज दिला जाईल. सबमिट केल्यावर तुम्ही कधीही रिक्वेस्ट रद्द करू शकता.
हे फिचर सपोर्ट करणारे बिजनेस
एअरलाइन्स: अलास्का एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स, जेट ब्लू, साऊथ वेस्ट एअरलाइन्स, स्पिरिट एअर लाइन्स, युनाइटेड.
टेलेकॉम्युनिकेशन: अशुरन्स वायरलेस, बूस्ट मोबाइल, चार्टर कॉम्युनिकेशन, क्रिकेट वायरलेस, सॅमसंग, स्प्रिंट.
रिटेल: बेस्ट बाय, कॉस्टको, गेमस्टॉप, द होम डेपो, वॉलमार्ट.
सर्व्हिसेस: ADT, DHL, फेडेक्स, ग्रबहब, इंस्टाकार्ट, सिक्युरस टेक्नॉलॉजीज, स्टबहब, युपीएस आणि वेस्ट मॅनेजमेंट, झेले.
इन्शुरन्स: ईशुरन्स, स्टेट फार्म
लाइन वेटिंगला पर्याय म्हणून कॉल मी बॅक ही सेवा काही बिजनेस देतात. परंतु गुगल ही सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. टॉल्क टू रिप्रेजन्टेटिव्ह फिचर गुगल असिस्टंटमध्ये Duplex मधून आल्याची चर्चा आहे. डुप्लेक्सच्या माध्यमातून गुगल पासवर्ड चेंज, मुव्ही तिकीट खरेदी, रिटेल चेक आऊट, फूड ऑर्डर आणि फ्लाइट चेक इन अशी कामे करण्यासाठी युजर्सना मदत करणार होतं.
आता आलेलं नवीन फिचर गुगल पिक्सल फोनमधील “होल्ड फॉर मी” सारखंच आहे फक्त ते फोन अॅपच्या ऐवजी गुगल अॅपच्या माध्यमातून अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सना वापरता येईल. सध्या “टॉल्क टू अ लाइव्ह रिप्रेजन्टेटिव्ह” हे फिचर यूएसमध्ये उपलब्ध आहे.