Noise ColorFit Macro ची किंमत किती?
आम्ही तुम्हाला Noise ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेल्या Noise ColorFit Macro या स्मार्टवॉचची किंमती आणि प्रकार सांगणार आहोत. या स्मार्टवॉचच्या सिलिकॉन व्हेरिएंटची किंमत १३९९ रु. इतकी आहे. तुम्हाला जर लेदर व्हेरिएंट घ्यायचा असेल तर याची किंमत १४९९ रुपये इतकी आहे. मेटल व्हेरिएंटसाठी तुम्हाला अधिक १०० रुपये मोजावे लागतील म्हणजेच १५९९ इतके रुपये मेटल व्हेरिएंटची किंमत आहे.
ColorFit Macro घ्या Amazon वर
Noise ColorFit Macro ही स्मार्टवॉच ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर देखील उपलब्ध आहे. तुम्हाला Noise ColorFit Macro या स्मार्टवॉचची प्री-ऑर्डर करता येईल. याची पहिली विक्री 19 फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होणार आहे.
बाजारात स्मार्टवॉचचे अनेक प्रकार उपलब्ध
Noise ColorFit Macro ही स्मार्टवॉच तुम्हाला अनेक पर्यायात बाजारात मिळेल. आम्ही तुम्हाला खाली बाजारात उपलब्ध असलेले स्मार्टवॉचचे विविध प्रकार देत आहोत.
सिलिकॉन व्हेरिएंट
या प्रकारात तुम्हाला मिस्ट ग्रे, जेट ब्लॅक आणि स्पेस ब्लू हे कलर मिळतील
लेदर व्हेरिएंट
या प्रकारात तुम्हाला क्लासिक ब्लॅक आणि क्लासिक ब्राऊन ब्हे कलर मिळतील.
मेटालिक व्हेरिएंट
या प्रकारात तुम्हाला ब्लॅक लिंक आणि सिल्व्हर लिंक हे प्रकार मिळतील.
स्पेशालिटी काय?
- Noise ColorFit Macro मध्ये तुम्हाला 2.5D कर्व्ड ग्लास यासह दोन इंचचा TFT PCD डिस्प्ले दिला गेला आहे.
- ही स्मार्टवॉच 200 वॉच फेसला सपोर्ट करते
- ही स्मार्टवॉच Noise Tru Sync टेक्नॉलॉजी आणि ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते.
- यामध्ये इन बिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर आहे.
- या स्मार्टवॉचमध्ये मेटल फिनिश आणि अनेकविध सुविधा आहेत.
- यामध्ये तुम्हाला हेल्थ संदर्भात सेंसर्सची सुविधा देखील आहे.
- हार्ट रेट, SpO2 ब्लड याची पण माहिते देते.
क्रीडाप्रेमींसाठी पण खास
- तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल तर तुमच्यासाठी Noise ColorFit Macro मध्ये काही खास गोष्टी आहेत. त्या कोणत्या ते पाहुया.
- या स्मार्टवॉचमध्ये 115 स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहे.
- ही स्मार्टवॉच NoiseFit ॲपला लिंक करता येते.
- विशेष म्हणजे एकदा चार्ज केलं की 7 दिवस बॅटरी टिकते.
- यात गाणी, कॅमेरा कंट्रोल, नोटिफिकेशन डिस्प्ले हे पर्याय देखील आहे.
आम्ही तुम्हाला आज Noise ColorFit Macro या स्मार्टवॉच विषयी सविस्तर माहिती दिली आहे. अशाच प्रकारे नवनव्या गॅझेट आणि त्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू.