धक्कादायक! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात; पुढे काय घडलं?

हायलाइट्स:

  • धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात
  • धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल
  • निष्काळजीपणा करणारा चालक निलंबित

औरंगाबाद : गंगापूरहून उदगीरकडे जात असलेल्या धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग चालकाने लहान मुलाच्या हातात दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एसटी चालक आर.बी. शेवाळकर याला निलंबित करण्यात आलं आहे. ही घटना रविवारी (१२ सप्टेंबर) रोजी घडली असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

रविवारी गंगापूर आगारातील एसटी बस घेऊन आर. बी. शेवाळकर हे उदगीरकडे निघाले होते. बसमध्ये २५ पेक्षा अधिक प्रवासी होते. ही बस घेऊन जात असलेल्या शेवाळकर याने धावत्या बसचं स्टेअरिंग एका लहान मुलाच्या हातात दिलं. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त करत एसटी चालकाच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर सोमवारी शेवाळकर हे उदगीरहून बस घेऊन गंगापूर येथे आले असता त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

‘त्यांनी गाणं म्हटलं तर ती कला…’; चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर निशाणा?

याबाबत शेवाळकर यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या खुलाशामध्ये त्यांच्या बसमध्ये एका लहान मुलगा रडत होता. या लहान मुलाचं रडणं थांबवण्यासाठी त्याच्या हातात स्टेअरिंग दिलं, असा खुलासा त्याने दिल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग सोपवण्याच्या प्रकरणामुळे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी शेवाळकर याला निलंबित केलं आहे.

Source link

aurangabad newsST busएसटी बसऔरंगाबादनिलंबन
Comments (0)
Add Comment