आयपी ॲड्रेस कसा शोधाल?
तुमचा आयपी ॲड्रेस हा कसा शोधायचा त्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात आधी तुम्ही तुमचं Google सर्च इंजिन ओपन करा. त्यानंतर त्यावर ‘ माझा IP Address काय?’ असा प्रश्न सर्च करा. त्यानंतर तुम्हाला लागलीच पुढे दोन वेबसाईट देखील दिसतील. त्या पुढीलप्रमाणे https://www.whatismyip.com/ किंवा https://whatismyipaddress.com/
आयपी ॲड्रेस लॅपटॉपवर कसा शोधाल?
तुमच्या लॅपटॉपवर तुम्हाला स्थानिक आयपी ॲड्रेस कसा शोधायचा याविषयी आम्ही माहिती देणार आहोत. आता स्थानिक आयपी ॲड्रेस शोधणं हे सार्वजनिक आयपी ॲड्रेस शोधण्या इतकं सोपं नाही. यामध्ये दोन्ही प्लॅटफॉर्म पूर्णपणे वेगळे आहेत. आम्ही तुम्हाला आयपी ॲड्रेस शोधण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
Windows 11 मध्ये असा शोधा आयपी ॲड्रेस
- पहिले सेटिंगमध्ये जावे
- त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट यावर क्लिक करा
- त्यानंतर Properties यावर जावे
- तुम्हाला IPV4 आणि IPV6 Address मिळेल.
Windows 10 मध्ये असा शोधा आयपी ॲड्रेस
- पहिले सेटिंगमध्ये जावे
- त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेटवर क्लिक करा
- WiFi / इंटरनेट यावर क्लिक करा
- कनेक्शन/ हार्डवेअर प्रॉपर्टी यावर क्लिक करा
- तुम्हाला IPV4 आणि IPV6 Address मिळेल.
Mac यावर असा शोधा आयपी ॲड्रेस
- वरच्या डाच्या बाजूला ॲपल लोगो यावर क्लिक करा
- त्यानंतर सिस्टीम सेटिंग यावर क्लिक करा
- डाव्या बाजूला मेन्यू यात जाऊन WiFi यावर क्लिक करा
- WiFi कनेक्ट नंतर डिटेल्स यावर जावे
- त्यानंतर ३ डॉट यावर जावे
- त्यानंतर नेटवर्क सेटिंग यावर जावे
- तुम्हाला तुमचा आयपी ॲड्रेस मिळेल
iPhone मध्ये असा शोधा आयपी ॲड्रेस
- सेटिंग यामधून WiFi यामध्ये जावे
- i या पर्यायातून Wifi नेटवर्क कनेक्ट करा
- खाली स्क्रोल केलं की तुम्हाला आयपी ॲड्रेस मिळेल.
अँड्रॉइडवर असा शोधा आयपी ॲड्रेस
- सेटिंगमधून कनेक्शनवर जावे
- WiFi वर जाऊन कनेक्ट करा
- सेटिंग कॉग दिसेल
- व्ह्यू मोर यावर क्लिक करा
- खाली स्क्रोल केलं की आयपी ॲड्रेस दिसेल
आयपी ॲड्रेसमध्ये काय आहे?
आयपी ॲड्रेस यात काही अंक असतात. यामध्ये तुम्हाला मध्ये-मध्ये पूर्णविराम दिसेल. चार संख्यांप्रमाणे तुम्हाला हा आयपी ॲड्रेस दिसेल. उदा. ३८.२१९.२४७.२३८. या अंकांमध्ये डिव्हाइसेसची ओळख तपशील, इंटरनेटवरील डेटा ट्रान्समिशन आणि स्टोरेजचे नियम समाविष्ट आहेत. म्हणून नाव इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच आयपी म्हणून दिले आहे. अशीच नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देत राहू.