तुम्ही म्हणाल तसा व्हिडीओ बनवून देईल हा AI; ChatGPT बनवणाऱ्या कंपनी OpenAI नं केली कमाल

ChatGPT च्या पॅरेंट कंपनी OpenAI नं नवीन AI मॉडेल सादर केला आहे. आतापर्यंत आपण ChatGPT कडून स्क्रिप्ट लिहून घेतली असेल आणि Dall-E वर फोटोज क्रिएट केले असतील, नवीन टूल AI ला नव्या उंचीवर घेऊन जातो. आम्ही बोलत आहोत OpenAI Sora बद्दल, ज्याच्या मदतीनं तुम्ही व्हिडीओ जनरेट करू शकता. हे व्हिडीओज बनवण्यासाठी तुम्हाला फोटोज किंवा क्लिप्स वापरण्याची गरज नाही. तुम्ही फक्त टेक्स्ट लिहून या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ बनवू शकता. चला जाणून घ्या OpenAI Sora बद्दल सर्व काही.

Sam Altman नं दिली माहिती

OpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून हा नवीन टूल जगासमोर ठेवला आहे. Google आणि Meta नं देखील अशाप्रकारची टेक्नॉलॉजी याआधी दाखवली आहे, परंतु OpenAI नं क्वॉलिटीवर खूप जास्त काम केलं आहे.

कंपनीनं याची मायक्रोसाइट https://openai.com/sora देखील जारी केली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. Sora बाबत सांगताना Sam Altman नं लिहलं आहे की, ‘हा आमचा व्हिडीओ जेनरेटिव्ह मॉडेल Sora आहे, आज आम्ही याची सुरुवात रेड टीमसह केली आहे आणि निवडक क्रिएटर्स हे टूल अ‍ॅक्सेस करू शकतील.’

कधी वापरू शकाल तुम्ही

यातील काही व्हिडीओज क्रिएट करून त्यांनी रिप्लायमध्ये पोस्ट देखील केले आहेत. जर तुम्ही देखील हा व्हिडीओ क्रिएटिंग प्लॅटफॉर्मचा वापरू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. Sora अद्याप पब्लिकसाठी लाँच करण्यात आलेला नाही. कंपनीनं याबाबत जास्त माहिती दिली नाही.

हा प्लॅटफॉर्म सध्या रेड टीमसाठी उपलब्ध आहे, जी AI सिस्टम मधील त्रुटी शोधून काढते. त्यानंतर टीम सांगेल की कशाप्रकारे या प्लॅटफॉर्मचा वापर व्हिज्युअल आर्टिस्ट, डिजाइनर्स आणि फिल्ममेकर करू शकतील. कंपनीच्या मते सध्या या सिस्टमला काही प्रॉम्प्ट समजत नाहीत. हा प्लॅटफॉर्म कधी पर्यंत सार्वजनिक होईल याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही

Source link

ChatGPTOpenAIopenai launches sorasora video generation ai toolआर्टिफिशीयल इंटेलिजन्सएआयचॅटजीपीटी
Comments (0)
Add Comment