वनप्लस युजर्सना कंपनी देणार पैसे; १६ मार्च पर्यंतच मिळेल परतावा, जाणून घ्या कारण

OnePlus नं आपला यावर्षीचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12R गेल्या महिन्यात लाँच केला होता. लाँचच्या वेळी कंपनीनं सांगितलं होतं की OnePlus 12R च्या 256GB व्हर्जनमध्ये UFS 4.0 स्टोरेज दिली जाईल. परंतु यावर अनेक युजर्सनी शंका व्यक्त केली कारण या फोनचा रीड आणि राइट स्पीड कमी होता. यावर उत्तर देताना कंपनीनं आपली चूक मान्य केली आणि सांगितलं की वनप्लस १२आरच्या सर्व व्हेरिएंटमध्ये UFS 3.1 स्टोरेजचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीनं आपल्या विधानात म्हटलं होतं की, “ आम्ही लाँचच्या वेळी अशी घोषणा केली होती की वनप्लस १२ आर मधील ट्रिनिटी इंजिनमुळे फोनची मेमरी आणि स्टोरेज पुढील अनेक वर्ष फास्ट आणि स्मूद चालेल. परंतु एका चुकीमुळे आम्ही असं सांगितलं होतं की ट्रिनिटी इंजिन सपोर्ट असलेली स्टोरेज काही व्हेरिएंटमध यूएफएस ४.० असेल. परंतु आता कंफर्म करत आहोत की वनप्लस १२आरच्या सर्व व्हेरिएंटमध्ये यूएफएस ३.० स्टोरेज देण्यात आली आहे जी ट्रिनिटी इंजिन सपोर्टसह येते.”

आता वनप्लस प्रेजिडन्ट किंडर लिऊ यांनी पुढील उपाययोजना सांगितली आहे, त्यानुसार ज्या ग्राहकांनी २५६जीबी व्हेरिएंट घेतला होता त्यांना रिफंड दिला जाईल. परंतु हा रिफंड फक्त १६ मार्च पर्यंत दिला जाईल.

कम्युनिटी फोरमवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “सयंम बाळगल्याबद्दल तुमचे आभार. मला कळवण्यास आनंद होत आहे की आमच्या कस्टमर सर्व्हिस टीमला आता परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला वनप्लस १२आरचा २५६जीबी व्हेरिएंट मिळाला असेल आणि त्यातील फाइल सिस्टम टाइप विषयी काही शंका असतील तर तुम्ही कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला पुढे काय करायचं हे सांगतील, यात १६ मार्च २०२४ पर्यंत रिफंड देण्याची देखील सोय करण्यात आली आहे.

आम्हाला अजूनही विश्वास आहे की तुमच्या मोठ्या अपेक्षांवर वनप्लस १२आर खरा ठरेल, आणि तुम्हाला हा फोन आवडेल जेव्हा तुम्ही वापराल. परंतु आमच्या या त्वरित कारवाईमुळे आम्हाला तुमची काळजी आहे हे देखील तुम्हाला दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.”

UFS 3.1 आणि UFS 4.0 स्टोरेज मधील फरक

यूएफएस ४.० स्टोरेज जास्त वेगवान रीड आणि राइट स्पीड देते. तर यूएफएस ३.० स्टोरेज तुलनेने थोडी स्लो असते आणि हिचा वापर अनेक परवडणाऱ्या प्रीमियम आणि मिड रेंज स्मार्टफोन्समध्ये केला जातो, यात वनप्लस ११ सीरिजचा देखील समावेश आहे. वनप्लसनं म्हटलं आहे की जरी फोनमध्ये यूएफएस ३.१ स्टोरेज असली तरी वनप्लस १२आर मेमरी रीड आणि राइटच्या बाबतीत चांगली परफॉर्मन्स देईल.

Source link

OnePlusoneplus 12roneplus 12r storageufs 3.1ufs 4.0वनप्लसवनप्लस १२आर
Comments (0)
Add Comment