पत्रात नेमके काय?
13 फेब्रुवारीला BSNL च्या कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी पी. अभिमन्यू यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर एका पत्राद्वारे BSNLची सत्य परिस्थिती मांडली. दूरसंचार कंपन्या दिवसागणिक अपडेट होत आहे. नवनव्या सुविधा ग्राहकांना देत आहे. मात्र, BSNL ही कंपनी या स्पर्धेत कुठेतरी मागे पडत असल्याची जाणीव या पत्रातून पी. अभिमन्यू यांनी केंद्र सरकारला करून दिली आहे.
BSNL च्या 4G सेवेत विलंब
सरकारी कंपनी BSNLचे 4G नेटवर्क TCS द्वारे संपूर्ण भारतात टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. काही मंडळांमध्ये काही हजार साइट्स आधीच सुरू आहेत. पण, युनियनच्या म्हणण्यानुसार, बीएसएनएलच्या सीएमडीने त्यांना आधी कळवले होते की संपूर्ण भारतातील 4जी सेवा ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू केली जाईल. मात्र, आठवडाभरापूर्वी अहमदाबाद येथे युनियन आणि बीएसएनएलचे सीएमडी यांच्यात बैठक झाली. यावेळी सीएमडीने माहिती दिली की, ‘बीएसएनएलची 4जी सेवा डिसेंबर 2024 मध्ये लाँच केली जाईल,” असे युनियनच्या पत्रात म्हटले आहे.
…तर वोडाफोनची 4G ची सेवा द्या – पी. अभिमन्यू
4G सेवेचे काम संथ गतीने होत आहे. त्यामुळे BSNL ग्राहक गमावत आहे. बीएसएनएल कर्मचारी युनियनचे सरचिटणीस पी अभिमन्यू म्हणाले की, भारत सरकार वोडाफोन आयडियाचे 33.1 टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठे भागधारक आहे. BSNLला वोडाफोन आयडियाचे 4G नेटवर्क वापर करण्यासंदर्भात परवानगी द्यावी, असं देखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
कंपनीला तोटा
बीएसएनएलच्या 4जी लाँचमध्ये वेळ लागत आहे. या विलंबामुळे कंपनीला आर्थिक नुकसानीला समोर जावं लागू शकतं, अशी भीती देखील पत्रात नमूद करण्यात आली आहे.
‘टीसीएस’चे काम संथ गतीने
BSNL च्या 4G लाँचिंगच्या तारखेत बदल होत आहे. यामागचे कारण देखील पत्रात नमूद करण्यात आले आहेत. टीसीएसकडून BSNL कंपनीच्या 4G इन्स्टॉलेशनला वेळ लागत आहे. टीसीएसने आजपर्यंत 4G नेटवर्क संदर्भातील क्षेत्रीय चाचण्या देखील पूर्ण केल्या नाहीत, असं देखील पी. अभिमन्यू यांनी पत्रात नमूद केले आहे.