तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं. १०१९/२०२३ भादवि कलम ३०७,५०४,५०६,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) कलम ३ (१), ३(२), ३(४) मधील पाहीजे आरोपी नामे ओमकार दिपक जाधव, वय २० वर्षे, रा. आदर्शनगर उरुळी देवाची पुणे हा गेले पाच महिन्यांपासुन मिळुन येत नव्हता. त्याचा राहते घरी इतरत्र शोध घेतला परंतु तो मिळुन येत नव्हता. सदर आरोपी मिळुन येणेकामी आर. राजा मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५, पुणे शहर यांनी मा. वपोनि संतोष सोनवणे, पोनि गुन्हे मानसिंग पाटील यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी तपास पथकास सुचना देवुन आरोपीचा शोध घेणेबाबत कळविलेवरुन सपोनि दिनेशकुमार पाटील यांनी आज दि. १६/०२/२०२४ रोजी टिम तयार करुन आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व संतोष बनसुडे यांना गुप्त बातमीद्वारे माहीती मिळाली की, वर नमुद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ओमकार
जाधव, रा. उरुळी देवाची, पुणे हा हांडेवाडी चौक येथे थांबलेला आहे. अशी माहीती मिळताच सदरची बातमी त्यांनी सपोनि दिनेशकुमार पाटील यांना कळविली. लागलीच सपोनि दिनेशकुमार पाटील हे त्यांचेसोबत असेलला स्टाफ पोलीस हवा. सतिश चव्हाण, पोहवा विशाल मेमाणे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला यांचेसह हांडेवाडी चौक येथुन आरोपी नामे ओमकार दिपक जाधव, वय २० वर्षे, रा. आदर्शनगर उरुळी देवाची पुणे यास ताब्यात घेतले आहे.
वरिल नमुद कारवाई मा. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा. शाहुराव साळवे सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, मा.पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.