इस्रोने काय म्हटलंय?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘युवा विज्ञान कार्यक्रम – २०२४’ ची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाची नोंदणी येत्या २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल.’
करिअरसाठी महत्त्वाचं
इस्त्रोचा ‘युवा संशोधक कार्यक्रम’ हा युवकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांना अंतराळ क्षेत्र यासंदर्भातील माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल. दोन आठवड्यांच्या निवासी कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असं इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे. तरुण विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इस्रोने हा कार्यक्रम आखला असल्याचे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म ‘X’ वर म्हटले आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) आधारित संशोधन आणि करिअरसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. तर पालक देखील या कार्यक्रमामुळे आपल्या पाल्यांसाठी आग्रही दिसत आहे.
अर्जाची अखेरची तारीख २० मार्च
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘युवा संशोधक कार्यक्रम’चे अर्ज २० फेब्रुवारी या तारखेपासून २० मार्चपर्यंत भरायचे आहेत. इस्रोने ‘कॅच डेम यंग’ या कार्यक्रमाची रचना केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
नोंदणी करा, अंतराळ तंत्रज्ञान शिका
विद्यार्थ्यांना सर्व विषयांची माहिती व्हावी, यासाठी पालक नेहमी आग्रही असतात. अगदी यासाठी प्रत्येक गोष्टींची माहिती वेगवेगळ्या उपक्रमातून शाळा देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. अशाच प्रकारचा हा कार्यक्रम इस्त्रोने हाती घेतला आहे. विद्यार्थी असताना मुलांना अंतराळ तंत्रज्ञान काय आहे, अवकाशात आपला देश कुठे आहे? जगभरात अवकाश तंत्रज्ञान याविषयी काय सुरू आहे. याविषयीची माहिती या ‘युवा संशोधक कार्यक्रम’ यातून मिळण्याची शक्यता आहे. यामध्यामातून विद्यार्थ्यांना देखील अंतराळ काय आहे, त्याविषयीची माहिती मिळाल्यास या क्षेत्राची गोडी लागते. तसेच कठीण असणारे क्षेत्र देखील यामाध्यमातून सोपे वाटू लागते.