शिवरायांचा अवमान करणारा छिंदम गोत्यात; ‘या’ गुन्ह्यात अटक

हायलाइट्स:

  • छिंदम बंधुंना अटक
  • अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक
  • जागेच्या वादातून टपरीचालकाला शिवीगाळ

अहमदनगरः काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याविरूद्ध दोन महिन्यांपूर्वी एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून ती जागा बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. गुन्हा घडल्यापासून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात ते फरार होते. त्यात यश आले नाही. अखेर रात्री तोफखाना पोलिसांनी त्यांना अटक केली.

यासंबंधी तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले की, गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते आढळून आले नाही. काल रात्री ते नगर शहरात आल्याची माहिती आम्हाला मिळाला, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाच अटक केली असून त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.

वाचाः ‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’

पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्याचे नगरसेवक पद गेले. तो दुसऱ्यांदा निवडून आला, तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.

त्यानंतर जुलै २०२१ महिन्यात त्याच्याविरूद्ध हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा भाऊ आणि तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (वय ५२ रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक केली. श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आता या गुन्ह्यात दोघा छिंदम बंधुंना अटक झाली आहे.

वाचाः ‘राहुल गांधी, विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून राष्ट्रीय सुरक्षेला कोणता धोका आहे?’

Source link

shripad chindamshripad chindam ahmednagarshripad chindam arrestedshripad chindam caseshripad chindam latest newsश्रीपाद छिंदम
Comments (0)
Add Comment