वृद्ध महिला घरात एकटी असताना शिरला बिबट्या; आजींनी धाडस दाखवलं अन्…

हायलाइट्स:

  • गडचिरोलीत घरात बिबट्या शिरला
  • घरात बिबट्या शिरल्यानं खळबळ
  • वृद्ध महिला एकटी असताना शिरला बिबट्या

गडचिरोलीः जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू असतानाच घरात बिबट घुसल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा अंतर्गत येणाऱ्या मोहली नियत क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मेटे जांगदा या गावी पहाटेच्या सुमारास कुत्र्याच्या शिकार करण्याकरिता पाठलाग करत बिबट्या चक्क घरात घुसल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घरात घुसल्याने आतमध्ये असलेल्या वृद्ध महिलेने त्वरित आपला जीव वाचवत कसेबसे बाहेर पडून कुलूप लावले आणि बिबट्याला जेरबंद केले. या घटनेची माहिती गावातील लोकांना कळताच एकच गर्दी केली.

बिबट्या घरात घुसल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले आहे. एवढेच नव्हे तर गडचिरोली तालुक्यात वाघांना जेरबंद करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम (आर आर टी) मागील सात दिवसापासून वाघांच्या शोधात आहे. आता तीच टीम मेटे जांगदा येथे दाखल झाली असून रेस्क्यू करून बिबट्याला पकडण्यात येणार आहे.

वाचाः अनिल देशमुखांच्या अर्जावर खंडपीठासमोरच होणार सुनावणी

घरात असलेल्या आजीबाईंनी समयसूचकता दाखवून या बिबट्याला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, घरात जेरबंद असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी आरआरटी टीम ला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहे. मागील काही महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांचे हल्ले सुरू असून यामध्ये आतापर्यंत १४ लोकांना जीव गमवावा लागला. वाघांना जेरबंद करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहे. वनविभागाकडून वाघांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.मात्र, अजून पर्यंत एकही वाघ हाती लागला नाही. वाघाची दहशत सुरू असतानाच आज धानोरा तालुक्यातील मेटे जांगदा येथे चक्क घरातच बिबट घुसल्याने खळबळ उडाली आहे. आता या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

वाचाः दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन; गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये, बोलावली तातडीची बैठक

Source link

gadchiroli latest newsgadchiroli newsleopard found in gadchirolileopard in gadchiroliगडचिरोलीबिबट्या शिरला घरात
Comments (0)
Add Comment