कोणते स्मार्टफोन ब्रँड आहेत टॉपवर
स्मार्टफोन मार्केट शेयर कमी होऊन देखील सॅमसंगनं १७ टक्के मार्केट शेयर मिळवून पहिले स्थान मिळवले आहे. कंपनीचा मार्केट शेयर ५.३ टक्क्यांनी घसरला आहे. विवो १२.५ टक्के मार्केट शेयरसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विवोची मार्केट साइज गेल्यावर्षीच्या तुलनेत ८.२ टक्क्यांनी वाढली आहे.
कोणाचा किती मार्केट शेयर
इंटरनॅशनल डेटा कॉरपोरेशन म्हणजे IDC च्या रिपोर्टनुसार, Realme चा मार्केट शेयर १२.९ टक्क्यांनी कमी होऊन १२.५ टक्के राहील आहे. जो साल २०२२ मध्ये १४.५ टक्के होता. त्यामुळे Realme तिसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न झाली आहे. आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेली चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा मार्केट शेयर २०२३ मध्ये २९.६ टक्क्यांनी पडला आहे, त्यामुळे कंपनीची मार्केट साइज १२.४ टक्के राहिली आहे. जी साल २०२२ मध्ये १७.८ टक्के होती. या लिस्टमध्ये शाओमी चौथ्या क्रमांकावर आहे, तर ओप्पो १०.३ टक्के मार्केट शेयरसह पाचव्या नंबरवर आहे.
साल २०२३ मधील टॉप १० स्मार्टफोन ब्रँड
- सॅमसंग – १७ टक्के
- विवो – १५.२ टक्के
- रियलमी – १२.५ टक्के
- शाओमी – १२.४ टक्के
- ओप्पो – १०.३ टक्के
- अॅप्पल – ६.४ टक्के
- वनप्लस – ६.१ टक्के
- पोको – ४.९ टक्के
- इनफिनिक्स – ३.१ टक्के
- टेक्नो – २.९ टक्के
- इतर – ९.२ टक्के