OnePlus 12R मध्ये UFS 4.0 स्टोरेज असल्याची खोटी जाहिरात
काही दिवसांपूर्वी वनप्लसनं दावा केला होता की त्यांच्या नव्या मिड रेंज स्मार्टफोन OnePlus 12R मध्ये UFS 4.0 स्टोरेज देण्यात आली आहे. परंतु फोन लाँच झाल्यानंतर ३ आठवडयांनी कंपनीनं मान्य केलं की वनप्लस १२आरच्या सर्व मॉडेलमध्ये यूएफएस ३.० स्टोरेज देण्यात आली आहे. यामुळे कंपनी ग्राहकांना रिफंड देणार असल्याची घोषणा देखील केली आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्राहकांचा विश्वास कमी झाला आहे हे नक्की.
OnePlus 12 च्या भारतीय व्हेरिएंटमध्ये E-SIM सपोर्ट
OnePlus नं आपल्या डिवाइसच्या स्पेक्स पेजवर चुकीची माहिती दाखवली आहे. वनप्लस १२आर सोबत लाँच झालेल्या OnePlus 12 बाबत देखील असंच काहीसं घडलं आहे. आधी या फोनमध्ये भारतात E-SIM सपोर्ट मिळेल असं सांगण्यात आलं, काही ग्राहकांनी फक्त याच कारणामुळे फोन खरेदी केला. परंतु कंपनीनं नंतर सांगितलं की भारतात OnePlus 12 मध्ये ई-सिम सपोर्ट मिळणार नाही. हे फिचर देखील फक्त चिनी मॉडेलमध्ये देण्यात येईल.
अपडेट नंतर Green Line
गेल्यावरही फोन अपडेट केल्यानंतर डिस्प्लेवर हिरवी रेष येण्याची समस्या आली होती. यात कंपनीच्या OnePlus 8 Pro, OnePlus 8T, OnePlus 9 आणि OnePlus 9R ह्या मॉडेल्सचा समावेश होता. त्यामुळे या मॉडेल्सवर कंपनीनं आजीवन डिस्प्ले वॉरंटी दिली होती. ज्या युजर्सच्या OnePlus 8 आणि OnePlus 9 सीरीज फोनमध्ये हिरव्या रेषेची समस्या आली त्यांना या वॉरंटी अंतगर्त मोफत स्क्रीन रिपेयर करून मिळणार आहे. ही लाइफटाइम स्क्रीन वॉरंटी फक्त भारतीय युजर्ससाठी उपलब्ध आहे.
OnePlus Nord 2 ब्लास्ट
OnePlus Nord 2 हा कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन्स पैकी एक आहे. परंतु यात क्वॉलिटी इश्यू होता, ज्याचे मूळ कारण मात्र कंपनीनं कधीच शोधलं नाही. आणि अनेकदा वनप्लस नॉर्ड २ चा स्फोट झाल्याच्या बातम्या भारतभरातून आल्या होत्या.
OnePlus 9 च्या बेंचमार्क स्कोर मध्ये झोल
३ वर्षांपूर्वी आलेल्या OnePlus 9 सीरिजमध्ये देखील एक समस्या होती. या सीरिजमधील वनप्लस ९ प्रोच्या बेंचमार्क स्कोरमध्ये कंपनी फसवणूक करत असल्याचा खुलासा करण्यात आला होता. यासाठी कंपनीनं बेंचमार्किंग अॅप्सना विशेष प्राधान्य देत होती, त्यामुळे टेस्टचे रिजल्ट चांगले येत होते. तर भारतीय वनप्लस ९ च्या भारतीय मॉडेलमध्ये कंपनीनं वायरलेस चार्जिंग दिली नव्हती परंतु ग्लोबल मॉडेलमध्ये हे फिचर होतं.
वनप्लस ९ मध्ये फक्त दोन ‘५जी बँड’ होते आणि कंपनीनं दावा केला होता की सॉफ्टवेअर अपडेटमधून आणखी बँड्सचा सपोर्ट दिला जाईल, असं कंपनीनं सांगितलं होतं. कालांतराने एका कम्युनिटी पोस्ट द्वारे वनप्लसनं हे शक्य नसल्याचं मान्य केलं.
या आहेत वनप्लसच्या आतापर्यंतच्या ५ मोठ्या चुका ज्यामुळे भारतीयांचा वनप्लसवरील विश्वास कमी झाला आहे. चुका मान्य करणे ही चांगली बाब आहे परंतु सतत चुका केल्यामुळे ग्राहक दुरावण्याची शक्यता वाढते.