Xiaomi 14 इंडिया लाँच डेट
शाओमी इंडियानं अधिकृतपणे माहिती दिली आहे की येत्या ७ मार्चला भारतात एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे आणि या इव्हेंटच्या मंचावरून Xiaomi 14 भारतात लाँच केला जाईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीनं आपला अपकमिंग फोन #XiaomixLeica हॅशटॅगसह टीज करण्यास सुरुवात केली आहे. फोन लाँचची वेळ आणि लाइव्ह स्ट्रीम लिंक समोर येईल.
Xiaomi 14 ची संभाव्य
शाओमी १४ चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. तिथे फोन ४ मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता ज्याची किंमत ३९९९ युआन (जवळपास ४६,००० रुपये) पासून ४९९९ युआन (सुमारे ५७,००० रुपये) पर्यंत आहे. ही ८जीबी/२५६जीबी आणि १६जीबी/१टीबी व्हेरिएंटची किंमत आहे. आशा आहे की Xiaomi 14 ची भारतीय किंमत ४० हजार रुपयांपासून सुरु होऊ शकते. तर फोनचा १टीबी व्हेरिएंट भारतात येण्याची शक्यता कमी आहे.
Xiaomi 14 Specifications
Xiaomi 14 फोनमध्ये ६.३६ इंचाचा Huaxing C8 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1.5K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरवर चालतो, जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंतची स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी हा फोन Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ह्यात 50MP Hunter 900 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला OIS सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर OIS सपोर्टसह आणि 50MP चा टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 4610mAh ची आहे, जी 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.