टिप्सटर Ishan Agarwal नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्मार्टफोनच्या रिटेल बॉक्सची एक इमेज शेयर केली आहे जो Realme 12+ 5G असू शकतो. या टिप्सटरनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन लवकरच देशात लाँच केला जाईल. कंपनीच्या वेबसाइटवर देखील एका स्मार्टफोनसाठी लँडिंग पेज सुरु झालं आहे. परंतु त्यावर Realme 12+ 5G चा उल्लेख सापडलेला नाही.
अलीकडेच Realme 12+ 5G स्मार्टफोन TENAA सर्टिफिकेशन साइटवर मॉडेल नंबर RMX3866 सह दिसला होता. यात ६.७ इंचाचा फुल HD+ (२,४०० x १,०८० पिक्सल) AMOLED डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोरचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ६जीबी रॅम, ८जीबी रॅम, १२जीबी रॅम आणि १६जीबी रॅमसह १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी आणि १ टीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.
Realme 12+ 5G च्या ट्रिपल रियर कॅमेरा यूनिटमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, एक अल्ट्रावाइड लेन्ससह ८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर मिळू शकतो. तसेच फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ४,८८० एमएएच रेटेड बॅटरी असू शकते.
realme Note 50 चे स्पेसिफिकेशन्स
realme Note 50 मध्ये ६.७४ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले, १६०० x ७२० पिक्सल रिजॉल्यूशन, २६०पीपीआय पिक्सल डेंसिटी, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १८०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. यात UNISOC T612 चिपसेसह ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. कंपनीनं मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा देखील समावेश केला आहे. हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय टी एडिशनवर चालतो.
डिव्हाइसमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि १० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि मोनोक्रोम सेन्सर सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. realme Note 50 मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर, आयपी५४ रेटिंग, ३.५मिमी हेडफोन जॅक सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाइसमध्ये ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ ५.० जीपीएस यूएसबी टाइप सी पोर्ट मिळतो.