Samsung Galaxy A34 5G ची किंमत आणि ऑफर
सॅमसंग गॅलेक्सी ए३४ ५जी वर ३,००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे डिवाइसचा ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेल, आता तुम्हाला २४,४९९ रुपयांमध्ये मिळेल जो आधी २७,४९९ रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच, ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २६,४९९ रुपये आणि ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये झाली आहे.
स्मार्टफोन नव्या किंमतीत सॅमसंग इंडिया वेबसाइट, अॅमेझॉन इंडिया आणि विजेय सेल्सवर विकला जात आहे. गॅलेक्सी ए३४ ५जी जेव्हा गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता तेव्हा याची किंमत ३०,९९९ रुपयांपासून सुरु होत होती. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पर्पल आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A34 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A34 5G फोन ६.६ इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. सुपर अॅमोलेड पॅनलवर बनलेली ही स्मार्टफोन स्क्रीन व्हिजन बूस्टर फीचरसह आली आहे तसेच १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये ५जी व ४जी दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट आहे.
Samsung Galaxy A34 5G फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येतो. यात ६जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज, ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० चिपसेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर लाँच झाला होता जो वनयुआय ५.१ वर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए३४ ५जी फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे ज्यात एफ/१.८ अपर्चर असलेला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर एफ/२.२ अपर्चर असलेली ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/२.४ अपर्चर असलेला ५ मेगापिक्सल मॅक्रो लेन्स पण देण्यात आला आहे. फोन एफ/२.२ अपर्चर असलेल्या १३ मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.