प्रक्षोभक आणि समाजात फूट पडणारे व्हिडीओ
सामाजिक भेदभावाला चालना देणारे व्हिडीओ शेयर करणे आणि स्मार्टफोनमध्ये साठवून ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे याबाबत तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण एका चुकीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये घडलेल्या दंगलीत पोलिसांनी अश्या अनेक लोकांना अटक केली होती, ज्यांच्या मोबाइलमध्ये असे व्हिडीओ आढळले होते.
आक्षेपार्ह व्हिडीओ
महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ देखील शेयर करू नये. असे सर्व व्हिडीओ आक्षेपार्ह व्हिडीओच्या श्रेणीत येतात. त्यामुळे तुम्ही सावधानता बाळगली पाहिजे. अश्या कंटेंटपासून दूर राहिलं पाहिजे. तसेच चुकूनही असे व्हिडीओ शेयर करू नका. अनेकदा नकळत तुम्ही असं केलं तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. असे व्हिडीओ शेयर केल्यामुळे अनेक युजर्सवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
बाल लैंगिक शोषण
बाल लैंगिक शोषणाबद्दल देखील सरकार खूप गंभीर आहे. त्यामुळे अश्या घटना दाखवणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडीओपासून लांब राहावे. असे व्हिडीओ तुमच्या स्मार्टफोनमध्ये असल्यास ते त्वरीत डिलीट केले पाहिजेत. अनेक युजर्स याबाबत खूप सक्रिय देखील आहेत. तसेच पोलीस देखील याबाबत खूप सजग झाले आहेत. या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत काम करत आहे. त्यामुळे वरील तीन प्रकारचे व्हिडीओ मोबाइल मध्ये बाळगू नये किंवा त्यांचा प्रसार देखील करू नये.