आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Asus मोबाइल येतोय बाजारात; ‘या’ तारखेला होईल लाँच

Asus नं कंफर्म केला आहे की कंपनी १४ मार्च २०२४ रोजी आपला आगामी स्मार्टफोन Zenfone 11 Ultra जागतिक बाजारात लाँच करेल. कंपनीनं शेयर केलेल्या लाँच पोस्टरनुसार आगामी झेनफोनचा लाँच इव्हेंट स्थानिक वेळेनुसार ८ वाजता तैवानमध्ये आयोजित केला जाईल, तसेच न्यूयॉर्क आणि बर्लिनमध्ये देखील शो केले जातील, त्यामुळे हा मॉडेल तैवानसह यूएस आणि युरोपियन बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे.

कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये एआय-इंटिग्रेशन टीज केलं आहे. यात नेमक्या कोणत्या फीचर्सचा समावेश असेल, याचा मात्र कोणताही खुलासा झाला नाही. आसूसनं टीजर व्हिडीओ मधून झेनफोन ११ अल्ट्रा मधील व्हिडीओ स्टॅबिलायजेशन, पोर्ट्रेट मोड आणि दीर्घकाळ पुराणाऱ्या बॅटरीची माहिती दिली आहे.
हे देखील वाचा:
आयफोन १५ प्रो पेक्षा वेगवान स्मार्टफोन आला भारतात; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन नव्हे ‘इथे’ सुरु झाली विक्री

याच महिन्यात Zenfone 11 Ultra च्या डिजाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली होती. हा डिवाइस ROG Phone 8 Pro सारखाच वाटत आहे. फक्त यात आरजीबी लाइट्स आणि एअर ट्रिगर असे गेमिंग फिचर दिसत नाहीत.

झेनफोन अल्ट्रा ११ मध्ये ६.७८ इंचाचा एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, ज्यात फुल एचडी+ रिजोल्यूशन, १-१४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली चिपसेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. सोबत 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजचा समावेश केला जाईल. विशेष म्हणजे यात देखील आरओजी फोन ८ प्रो मधील कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल जो IMX890 सेन्सर असू शकतो, सोबत ३२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असे जी 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. सेटअपमध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील असेल.

Zenfone 11 Ultra मध्ये पावर बॅकअपसाठी ५,५००एमएएचची बॅटरी दिली जाईल, ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ६५ वॉट वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. तसेच हा फोन १५ वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. कंपनी यात हेडफोन जॅक देखील देत आहे, जो २०२४ मधील फ्लॅगशिप फोनमध्ये मिळतच नाही. आगामी Zenfone 11 Ultra स्मार्टफोन इंटर्नल ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, मिस्टी ग्रे, वर्ड्यूर ग्रीन आणि डेजर्ट सियाना कलरमध्ये उपलब्ध होईल.

Source link

asus zenfoneasus zenfone 11 ultraasus zenfone 11 ultra to be launchआसूस गेमिंग फोनआसूस झेनफोन ११ अल्ट्राआसूस फोनआसूस मोबाइल
Comments (0)
Add Comment