iPhone पाण्यात पडल्यावर काय करावं?
आयफोनमधील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी तुमचा डिवाइस हातावर हलक्या हाताने आपटा, असं करताना कनेक्टर खालच्या बाजूला असेल याची काळजी घ्या, असं कंपनीनं सांगितलं आहे. हे केल्यावर तुमचा फोन कोरड्या जागेत ठेवा जिथे हवा खेळती असेल. त्यानंतर ३० मिनिटांनी यूएसबी टाइप सी किंवा लायटनिंग कनेक्टरचा वापर करून तुमचा फोन चार्ज करा. तुमच्या आयफोनमधील पाणी निघून जाऊन पूर्णपणे सुकण्यासाठी २४ तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. दरम्यान फोन अधून मधून लिक्विड डिटेक्शन अलर्ट देऊ शकतो.
हे देखील वाचा:
“आयफोन ओला असताना चार्ज करू नये परंतु इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला फोन हवा असतो. जर तुम्ही आयफोन ओला असताना केबल किंवा अॅक्सेसरीजशी कनेक्ट केला तर तुमच्याकडे इमर्जन्सीमध्ये लिक्विड डिटेक्शन ओव्हर राइड करून आयफोन चार्ज करण्याचा पर्याय असतो.” असं कंपनीने आपल्या सपोर्ट डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे.
तसेच अॅप्पलनं लिक्विड काढून टाकण्यासाठी हेयर ड्रायर किंवा कंप्रेस एअरचा देखील वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच इतर कापसाचा गोळा किंवा पेपर टॉवेल सारख्या वस्तूंचा वापर कनेक्टर साफ करण्यासाठी करू नये, असं देखील कंपनीचं म्हणणं आहे.
परंतु आयफोन युजर्सना वॉटर डॅमेजची इतकी काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण अॅप्पल आपल्या फ्लॅगशिप डिवाइस बाबत दावा करते की हे हँडसेट २० फूट पाण्यात ३० मिनिटांपर्यंत सहज राहू शकतात. आणि त्यानंतर देखील आयफोन्स बिनदिक्कत चालू शकतात, त्यामुळे जर तुमचा फोन ओला झालाच तर तो तांदळाच्या पिशिवीत किंवा डब्ब्यात टाकून परिस्थिती बिघडवू नका.