OnePlus Watch 2 चा फोटो आला समोर; कोणते फीचर्स मिळतील? जाणून घ्या

OnePlus नं वर्ष २०२१ मध्ये आपला पहिला स्‍मार्टवॉच OnePlus Watch लाँच केला होता. कंपनी आता या स्मार्टवॉचचा उत्तराधिकारी लाँच करण्याची तयारी करत आहे. जो OnePlus Watch 2 नावानं लवकरच ग्राहकांच्या भेटीला बाजारात येऊ शकतो. या वॉच संबंधित थोडी काही माहिती आधी देखील लीक झाली होती. असं म्हटलं जात की वॉच २ Google Wear OS 4 सह बाजारात येईल. आता वनप्‍लस कम्‍युनिटीच्या वेब पेजवरून या वॉचची एक झलक मिळाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार याची डिजाइन OnePlus 12 शी प्रेरित असेल. बटन्सची एक जोडी देखील टीजर मध्ये दिसत आहे. अशी अफवा आहे की OnePlus Watch 2 मध्ये १.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल आणि हा क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन डब्ल्यू५ जेन १ प्रोसेसरच्या पावरसह लाँच होईल.
हे देखील वाचा:
OnePlus Watch 2 होणार भारतात लाँच, मिळतील अनेक अपग्रेडेड फीचर्स

आज सकाळीच्या एका पोस्‍ट मध्ये वनप्‍लसनं देखील हे वॉच टीज केलं आहे म्हणजे हे लवकरच लाँच होऊ शकतं. वनप्‍लस संबंधित अचूक लीक्‍स देणाऱ्या Max Jambor चा दावा आहे की OnePlus Watch 2 या २६ फेब्रुवारीला ऑफ‍िशियली लॉन्‍च केला जाईल. टिपस्टरनुसार हे स्मार्टवॉच, मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (MWC) २०२४ दरम्यान लाँच होईल जो २६ फेब्रुवारीपासून २९ फेब्रुवारी पर्यंत बार्सिलोना मध्ये आयोजित करण्यात आला आहे.


कंपनीनं आपलं पाहिलं स्मार्टवॉच OnePlus Watch एप्रिल २०२१ मध्ये १४,९९९ रुपयांमध्ये लाँच केलं होतं. OnePlus Watch ध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी६८ रेटिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर हे वॉच ५एटीएम वॉटर रेजिस्टंट आहे. या वॉचमध्ये ४०५ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे वार्प चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं. हे ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ग्लोनास, गॅलीलियो आणि सारख्या कनेक्टिव्हिटी ऑप्शनसह येतं. हे वॉच भारतात १६,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे मिडनाइट ब्लॅक आणि मूनलाइट सिल्व्हर कलरमध्ये विकत घेता येईल. तसेच Cobalt लिमिटेड एडिशन देखील सादर करण्यात आला होता.

Source link

OnePlusoneplus watch 2oneplus watch 2 launchsmartwatchवनप्लसवनप्लस वॉचवनप्लस वॉच २स्मार्टवॉच
Comments (0)
Add Comment