DSLR सारख्या फीचर्ससह आला शक्तिशाली Xiaomi 14 Ultra , जाणून घ्या किंमत आणि संपूर्ण माहिती

शाओमीनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 Ultra होम मार्केट चीनमध्ये आणला आहे. जो २५ फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस २०२४ च्या माध्यमातून ग्लोबली सादर केला जाईल. डिवाइसची खासियत यातील क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर ब्रँड कॅमेरा प्रेमींसाठी फोटोग्राफी किट देखील मिळेल. चला, जाणून घेऊ शाओमी १४ अल्ट्राचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

Xiaomi 14 Ultra चा कॅमेरा

फोनमध्ये कंपनीनं युजर्सना डीएसएलआर कॅमेरा अनुभव देण्यासाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. म्हणजे की यात चार शानदार कॅमेरा लेन्स आहेत. Xiaomi 14 Ultra मध्ये ५० मेगापिक्सल LYT-900 प्रायमरी कॅमेरा आहे. हा दुसर्‍या जेनेरेशनचा १ इंच कॅमेरा सेन्सर आहे. या लेन्समध्ये एफ १.६३ ते एफ४.० च्या वेरिएबल अपर्चरचा सपोर्ट देण्यात आला आहे. सोबत ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा, ३.२x ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सलचा IMX858 कॅमेरा सेन्सर आणि ५x ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सल सोनी IMX858 पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: वनप्लस पेक्षा भारी Xiaomi चा फोन येतोय भारतात; लाँच डेट आली समोर
हा कॅमेरा सेटअप ULTRA SNAP, ULTRA RAW आणि ULTRA ZOOM फीचर्ससह येतो. ज्यामुळे 30X AI सुपर झूम, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सर्व फोकल लेंथवर फुल-फोकस 8K व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. तर फ्रंटला ब्रँडनं शाओमी १४ अल्ट्रा मध्ये ३२ मेगापिक्सलची कॅमेरा लेन्स दिली आहे.

Xiaomi 14 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 Ultra मध्ये युजर्सना ६.७३ इंचाचा बड़ा LTPO AMOLED पॅनल देण्यात आला आहे. जो १४४०×३२०० पिक्सल रिजॉल्यूशन, ३,००० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, १२०हर्टझ पर्यंतचा रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ला सपोर्ट करतो. ऑपरेटिंग सिस्टम पाहता Xiaomi 14 Ultra कंपनीनं लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर लाँच केला आहे.

मोबाइलमध्ये क्वॉलकॉमचा आता पर्यंतचा सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या टॉप मॉडेल मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फ्लॅगशिप मोबाइल Xiaomi 14 Ultra मध्ये पावर बॅकअपसाठी ब्रँडनं ५३००एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे. ही चार्ज करण्यासाठी ९०वॉट फास्ट चार्जिंग, ८० वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. अन्य फीचर्स पाहता Xiaomi 14 Ultra सॅटेलाइट कम्युनिकेशन, वाय-फाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम ५जी सारखे अनेक फीचर्स मिळतात.

Xiaomi 14 Ultra ची किंमत

Xiaomi 14 Ultra चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या १२जीबी +२५६जीबी स्टोरेजची किंमत ६,४९९ युआन म्हणजे सुमारे ७५,००० रुपये आहे. फोनच्या १६जीबी +५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६,९९९ युआन जवळपास ८२,००० रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेल १६ जीबी रॅम +१ टीबी स्टोरेजची किंमत ७,७९९ युआन म्हणजे जवळपास ९१,५०० रुपये आहे. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट अश्या तीन कलर ऑप्शन सह येतो.

Source link

Xiaomixiaomi 14 ultraxiaomi 14 ultra priceशाओमीशाओमी १४शाओमी १४ अल्ट्रा
Comments (0)
Add Comment