Airtel चा नवीन प्लॅन लाँच, फक्त १९५ रुपयांमध्ये करा विमानातून कॉलिंग, डेटा आणि SMS फ्री

एअरटेलनं नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन १९५ रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये इन-फ्लाइट रोमिंगची सुविधा मिळेल, परंतु जर प्रीपेड युजर्सनी २९९७ रुपये आणि पोस्टपेड युजर्सनी ३९९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा रोमिंग पॅक घेतलेला असेल तर मोफत इन-फ्लाइट रोमिंगची सुविधा मिळेल. एअरटेलच्या इन फ्लाइट रोमिंग सर्व्हिसमध्ये व्हॉइस, डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते.

पोस्टपेड रिचार्ज

  • १९५ रुपयांच्या पोस्टपेट प्लॅनमध्ये २५०एमबी डेटासह १०० मिनिटे आउटगोइंगसह, १०० आउटगोइंग एसएमएसची सुविधा मिळेल. हा प्लॅन २४ तासांच्या वैधतेसह येईल.
  • एअरटेलच्या २९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५००एमबी डेटासह १०० मिनिटे आउटगोइंगची सुविधा मिळेल. तसेच आउटोगोइंग १००एसएमएसची सुविधा दिली जाईल. हा प्लॅन देखील २४ तासांचा असेल.
  • ५९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटासह १०० मिनिटे आउटगोइंग कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याचबरोबर १०० आउटगोइंग एसएमएस दिले जातील. हा प्लॅन २४ तासांच्या वैधतेसह येईल.

हे देखील वाचा: आता ४९ रुपयांमध्ये मिळेल Unlimited Data; Jio नव्हे Airtel चा नवा प्लॅन सादर

प्रीपेड प्लॅन

  • १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २५०एमबी डेटा ऑफर केला जाईल. त्याचबरोबर १०० मिनिटे आउटगोइंग कॉलिंग आणि १०० आउटगोइंग एसएमएस दिले जातील. हा प्लॅन २४ तासांच्या वैधतेसह येईल.
  • २९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५००एमबी डेटासह १०० मिनिटे आउटगोइंग कॉल आणि १०० आउटगोइंग एसएमएसची सुविधा दिली जाईल. हा प्लॅन २४ तासांच्या वैधतेसह येतो.
  • ५९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा सह १०० मिनिटे आउटगोइंग कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जात आहेत. हा प्लॅन २४ तासांच्या वैधतेसह येतो.

विविध आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या 19 विमान कंपन्यांमध्ये इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी Airtel नं Aeromobile सोबत भागीदारी केली आहे.

ग्राहकांना त्यांच्या प्रवासादरम्यान मदत देण्यासाठी एअरटेलकडे 24X7 संपर्क केंद्र आहे. याव्यतिरिक्त, कंपनीकडे एक डेडिकेटेड WhatsApp क्रमांक 9910099100 आहे ज्यावर ग्राहक कॉल करू शकतात आणि नेटवर्क तज्ञांच्या गटाकडून रिअल-टाइम सहाय्य मिळवू शकतात. ग्राहकांकडे त्यांचा डेटा वापर व्यवस्थापित करण्यासाठी, अतिरिक्त मिनिटे खरेदी करण्यासाठी, एअरटेल थँक्स ॲपमध्ये लॉग इन करून रिअल-टाइम बिलिंग तपशील मिळविण्यासाठी सेल्फ-सर्व्हिस पर्याय देखील आहे

Source link

Airtelin-flightplansroaming packsusersएअरटेलएअरटेल रोमिंग प्लॅन
Comments (0)
Add Comment